शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव येथे वीज अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू तर तहसीलदार सैदाणे यांची भेट* *शासकीय मदतीचा दिला हात*

 








*शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव येथे वीज अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू तर तहसीलदार सैदाणे यांची भेट* *शासकीय मदतीचा दिला हात*                             

 

शिंदखेडा दि.०९(तालुका प्रतिनिधी यादवराव सावंत)  :

शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव येथे 7 सप्टेंबर 2021रोजी संध्या काळी झालेल्या  मुसळधार पावसात  मोठ्याप्रमाणात विजांचा कडकडाट झाला यातच  येथील आदिवासी वस्तीतील शांताराम महादु भिल राहणार मेथी हल्ली मुक्काम डोंगरगाव हा संध्याकाळी येथील सोनवद धरणात मासे धरण्यासाठी गेलेला होता परंतु अचानक वीज अंगावर पडल्याने तो मृत्यू पावला नातेवाईकानी सोनगीर ग्रामीण रुग्णालयात त्यास उपचारासाठी नेले होते परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले तो डोंगरगाव येथे काही दिवसापासून पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरीसाठी त्याचे सासरे रतिलाल एकनाथ भिल यांचेकडे आलेला होता त्याच्यामागे पत्नी व 3 मुले असा परिवार आहे या परिसरात ही दुर्दैवी पहिलीच घटना आहे त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे शासनस्तरावरून मृत व्यक्तीच्या कुटुंबास आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून धुळे व नंदुरबार जिल्हा डी डि सी बँकेचे संचालक प्रकाश पाटील मृतांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी शासनाकडे मदतीची हाक मागितलेली आहे.तसेच शिंदखेडा तहसीलदार सुनील सैदाणे व सर्कल श्री आर.एच.कोळी तलाठी सी डी पाटील यांनी तातडीने मयताच्या वारसांची भेट घेऊन त्यांना सात्वन केले.तसेच रेशन दुकान संघटनेचे तालुकाध्यक्ष आर.आर.पाटील हयांनी देखिल सहकार्य केले.तहसिलदार सैदाणे यांनी सांगितले की शासकीय जी आर्थिक मदत करावी ही मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.अशा कर्तव्य तत्परता व गरिबांचे अश्रू पुसुन सहकार्य दाखवून एक माणुसकी दाखवून दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने