*वरगव्हाणला सरपंच भूषणभाऊ पाटील यांच्या शुभहस्ते ५०० लाभार्थींना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप..खावटी अनुदान* *योजनेअंतर्गत मिळाला लाभ.. माजी आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे व आ.सौ.लताताई सोनवणे हे आदिवासींच्या जीवन उद्धारासाठी झिझतायं.. सरपंचांनी काढले गौरवोद्गार..!*

चोपडा दि.२(प्रतिनिधी)वरगव्हाण येथे “खावटी अनुदान योजना,, अंतर्गत ५०० कुटुंबांना संरपच भूषणभाऊ उर्फ प्रवीण गोरख पाटील यांच्या शुभहस्ते   जीवनावश्यक किट वाटप करण्यात आले आहेत. कठीणप्रसंगी मदत मिळाल्याने आदिवासी बांधवांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. 

आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे यांच्या प्रयत्नातून वरगव्हाण ग्रामपंचायत अंतर्गत ५००लाभार्थ्यांना खावटी अनुदान योजनेचा लाभ प्राप्त झालाआहे.त्या खावटी योजनेतील जीवनावश्यक वस्तूंचे किट आज  दि. २ सप्टेंबर रोजी    माननीय पोलीस पाटील नानासाहेब, सरपंच भुषण पाटील उपसरपंच प्रताप बारेला, रवींद्र पाटील, महेंद्रसिगं पाटील, खजानदादा, मोसीन तडवी आदी मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.  आदिवासी विभागातील पात्र लाभार्थ्यांनाकरिता महाराष्ट्र शासनाची "खावटी अनुदान योजना" अंतर्गत  मटकी एक १ किलो, चवळी २ किलो, हरभरा ३ किलो, पांढरा वाटाणा १किलो, तूरदाळ २किलो, उडीत डाळ १किलो, मीठ ३किलो, गरम मसाला ५०० ग्रम, शेंगदाणे तेल १लिटर, मिरची पावडर १ किलो, चहा पावडर ५०० ग्रम, साखर ३किलो, असे १८ किलो.ग्रम व १ लिटर असे अन्य धान्य, कड धान्य, व जीवनावश्यक वस्तूंचा या कीटमध्ये समावेश असतो.  अशा ५००कीट वरगव्हाण ग्रामपंचायत अंतर्गत पात्र लाभार्थींना देण्यात आल्या.यावेळी लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने