*जिल्हा परिषद/पंचायत समिती सदस्यांना मुदतवाढ द्या*.. जिल्हास्तरीय बैठकीत जि .प. व पं.स. च्या असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर.....जिल्हाध्यक्ष-प्रभाकर सोनवणे
यावल दि.१७(प्रतिनिधी): ग्रामिण महाराष्ट्राच्या हितासाठी व जिप/पंस सदस्यांच्या न्याय्य हक्कासाठी प्रथमच सर्वपक्षीय संघटना कैलास गोरे पाटील यांनी स्थापन केली आहे.जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व जि.प.व पं.स.सदस्यांची याबाबत विस्तृत बैठक प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज दि.१७/९/२१, शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता श्री छत्रपती शाहू महाराज सभागृह जिप जळगाव येथे राज्याचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली
कोरोना परिस्थिती मुळे जिप पंस सदस्यांना विकासकामासाठी पुरेसा निधी वेळेवर उपलब्ध झाला नाही या काळात कामे करता आली नाहीत.त्यामुळे दोन्ही सदस्यांना किमान एक वर्षाची मुदत वाढ मिळावी या प्रमुख मागणीसह
जिल्हापरिषद व पंचायत समिती ही शासनाचा निधी व विविध योजनांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे.असे असतांना शासनाने अनेक अधिकार कमी करुन विभागीय आयुक्तांकडे व राज्य शासनाकडे वर्ग केल्या गेल्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदार हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा मतदार असावा,जि.प.व पं.स.यांचे राजकीय आरक्षण किमान दहा वर्षासाठी कायम असावे,जि.प. व पं. स. मध्ये मनोनित ( को ॲाप ) सदस्यांची नियुक्ती करावी , ७३/७४ वी घटनादुरुस्ती पुर्णपणे राज्यात लागु करावी,पुर्वी प्रमाणे असणारे किमान बदली अधिकार आणि कर्मचारी नियंत्रणासाठी सी.आर. रिपोर्ट ईत्यादी सारखे अधिकार असावे,पंचायत समिती सदस्यांना विधानपरिषदे साठी मतदानाचा अधिकार असावा,जिल्हा परिषद सदस्यांना वीस हजार तर पंचायत समिती सदस्यांना दहा हजार रुपये मानधन असावे.यासह प्रमुख मागण्यांचा समावेश होता.
जिप पंस चे सदस्य ग्रामीण भागाच्या विकास प्रक्रियेच्या योगदानात महत्वाची भूमिका बजावत असतात मात्र काही सदस्यांवर अन्याय होत असल्याने असोसिएशनच्या माध्यमातून सदस्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेण्यात येईल
यांसह असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास गोरे पाटील कार्यक्रमाचे उद्घाटक मा.ना.रंजनाताई पाटील व राज्य कार्याध्यक्ष उदय बने राज्य संघटक संजू वाडे व राज्य उपाध्यक्ष जयमंगल जाधव तसेच उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष डॉ निलम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत जळगांव जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष यांचे तर्फे जाहीर करण्यात आली
जिल्हा कार्यकारिणीत प्रमुख सल्लागार म्हणून जिप अध्यक्ष मा ना रंजना ताई पाटील यांचेसह शिवसेना गटनेते तथा जिप सदस्य नानाभाऊ महाजन इतर जिप सदस्यांत पवन सोनवणे,सुरेखा पाटील,हिंमत पाटील, पल्लवी सावकारे,नंदा सपकाळे, कैलास सरोदे,अनिता गवळे, गजेंद्र सोनवणे, प्रभाकर सोनवणे (मोहाडी), सरोजिनी गरुड,सौ माधुरी अत्तरदे, प्रमिला पाटील, अनिल देशमुख,दिलिप पाटील समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे,मा.जिप सदस्य आर.जी.नाना पाटील वगैरे जि .प. व पं.स.सदस्यांत प्रतिभा बोरोले रावेर,प्रविण पाटील अमळनेर, अशोक पाटील पारोळा, अनिल महाजन एरंडोल,अमर पाटील जामनेर, सुभाष पाटील पाचोरा, रामकृष्ण पाटील भडगाव, शिवाजी सोनवणे चाळीसगांव यांची उपस्थिती होती.जिप पंस सदस्य पुरस्कार ह्या वर्षांपासून राबविण्याचे नियोजन केलेले आहे त्याकामी सप्टेंबर महिन्या अखेर संघटनेच्या पत्त्यावर पाठवावेत असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.पी.बोदडे नाना व आभार प्रदर्शन गौतम वाडे यांनी केले
===========