*कार्तिकी च्या यशाने तेली समाजाला आनंद**
*चोपडा दि.१८(प्रतिनिधी) चोपडा येथील मल्हार पुरा भागातील श्री मोतीलाल पौलाद चौधरी यांची नात तथा अनंत मोतीलाल चौधरी यांची सुकन्या कार्तिकी हिला राष्ट्रीय पातळीवर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2021 राज्य संघाचे कर्णधार म्हणून नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. समाजासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून ,कार्तिकीला शुभेच्छा देण्यासाठी समाजाचे पदाधिकारी यांनी घरी जाऊन कार्तिकीचे, तिच्या आजी-आजोबांचे, आई-वडिलांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री के .डी .चौधरी सर यांनी कार्तिके चा सत्कार केला. कार्तिके सोबत गप्पागोष्टी करत खेळाची माहिती जाणून घेत तिच्या कार्याचा गौरव केला. सोबत आजी आजोबा, आई वडील हे तिच्यासाठी जी मेहनत घेता आहेत त्या मेहनतीचे कौतुक करून समाजातर्फे धन्यवाद दिले. या चर्चेत शुभेच्छा देताना चोपडा तेली समाजाचे उपाध्यक्ष टी .एम .चौधरी सर, प्रदेश तेली महासंघ चोपडा तालुका अध्यक्ष श्री प्रशांत सुभाष चौधरी, श्री नारायण पंडित चौधरी, श्रीदेवकांत के.चौधरी आदीन्नी सहभाग घेतला. यावेळी जिल्हा स्तरावर मुलींना प्रेरणा मिळावी यासाठी कार्तिकीचा जिल्हा स्तरावर लवकरच सन्मान केला जाईल. असे यावेळी के. डी .चौधरी यांनी सूचित केले. यावेळी कार्तिकीला प्रशिक्षण देणाऱ्या अष्टविनायक स्पोर्ट्स क्लब च्या प्रशिक्षकांना धन्यवाद देण्यात आले.
