*शिंदखेडा तालुक्यातील भडणे परिसरात पावसाने तोंडाशी आलेला कापूस हिरावला शेतकरी चिंतातुर* शिंदखेडा तालुका प्रतिनिधी ( यादवराव सावंत ) शिंदखेडा तालुक्यातील भडणे परिसरात पावसाने तोंडात आलेला घास हिरावला ने शेतकरी आर्थिक अडचणीत कापूस वेचणी ला कापसाच्याऊ भावापेक्षा जास्त खर्च सुरुवातीला तब्बल अडीच महिने पावसाने पाठ फिरवल्याने भडणे परिसरात कापूस व्यवसाय अडचणीत सापडला होता मात्र आठ दिवसांपासून संततधार पावसामुळे,मे महिन्यात लागवड केलेल्या कापसाची बोंडे काही अतिशय काळी पडल्याने तीन ते चार हजार कापसाला भाव मिळत असल्याने कापसाच्या भावापेक्षा मजूर महाग पडत असल्याने कारण झाडावर बोड तोडायला पण मजुरी लागते आणि ते बोंडातून वेचणी करायला पण मजुरी लागते यामुळे कापूस वेचणीला डबल मजूर लागत असल्याने आर्थिक शेतकरीवर्गाला सोसावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे यावर्षी चांगला पाऊस पडेल या उमेदीने शेतकरी राजा आपल्या शेतात राब राब राबून महागडी खते बियाणे फवारणी कोळपणी इत्यादी शेतीची मशागत करून चांगले उत्पन्न येईल या भरोशावर कापूस हे पीक आर्थिक व चांगले उत्पन्न देणारे वाण म्हणून संबोधले जाते या उद्देशाने परिसरात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते या वर्षी कापूस लागवड मे महिन्याच्या 25 मे 30 मे च्या दरम्यान लावलेल्या कापसाची अतिशय दयनीय अवस्था झाली असून लाल तसेच कापसाच्या झाडावर बोंड काळी पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने शेतात टाकलेला खर्च देखील या वर्षी निघेल किंवा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पहिल्याच वेचनीत, कापूस निम्मा खाली झाला आहे परिसरात, पाऊस पाहिजे तसा झालेला नाही यामुळे दुसरी पीक घेणे सुद्धा भीतीच्या छायेत वावरत आहेत