आँनलाईन शिक्षण व १६ कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबवा : गटशिक्षणाधिकारी एन.के.शेख


 


आँनलाईन शिक्षण व १६ कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबवा : गटशिक्षणाधिकारी एन.के.शेख

मनवेल  ता.यावल दि.०१ (वार्ताहर )  साकळी व दहिगाव केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद डि. एच. जैन माध्यमिक विद्यालय कोरपावली येथे भुवनेश्वरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक  डि. व्ही पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक दहिगाव केंद्राचे केंद्र प्रमुख विजय ठाकूर यांनी केले. स्वाध्याय व सेतू अभ्यासक्रमाबाबतचा आढावा विजय ठाकूर  व कीशोर चौधरी यांनी घेतला. PGI संदर्भात नाविन्यपूर्ण पद्धतीने ONLINE KAHOOT प्रश्नावली व त्यावर सविस्तर मार्गदर्शन साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख  किशोर चौधरी यांनी केले. जळगाव जिल्हा आणि PGI यासंदर्भात  शरिफ तडवी सर यांनी मार्गदर्शन केले. 

साकळी केंद्रातील जि.प.प्राथ शाळा शिरसाड शाळेच्या website चे web. Zpschoolshirsad.in चे पब्लिकेशन मा ग. शि. अ. एन के शेख साहेब यांचे हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सौ संगिता पाटील , तंत्रस्नेही शिक्षक  दिपक चव्हाण  व सर्व शिक्षक वृदांचे अभिनंदन करण्यात आले. मा. गटशिक्षणाधिकारी एन. के. शेख साहेब यांनी स्वाध्याय तसेच 16 कलमी कार्यक्रम प्रभावी पणे राबविण्या संदर्भात मार्गदर्शन केले. साधन व्यक्ती  राहूल पाटील  यांनी NAS संदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर डायट जळगाव वरीष्ठ अधिव्याख्याता डॉ अरुण भांगरे  यांनी कोरोना व गुणवत्ता वाढीसाठी असलेले आव्हाने यावर चर्चा घडवून आणली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  समाधान कोळी, अनुमोदन  भिरुड सर तर आभार प्रदर्शन विजय ठाकूर  यांनी केले. व्यासपीठावर जैन हायस्कूल चे मुख्याध्यापक  तडवी सर तसेच शारदा माध्यमिक विद्यालय साकळी शाळेतील  पवार सर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने