![]() |
*प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते तत्काळ केवायसी करावे जिल्हाधिकारी कार्यालय येथील बैठकीत खासदार रक्षाताई खडसे यांचे निर्देश*
जळगांव दि.०१(प्रतिनिधी) : जिल्ह्यातील बरेच अल्प भुधारक शेतकरी पात्र असून सुद्धा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पासून वंचित आहे. त्याबाबत आज रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने संदर्भातील संबंधित अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या दालनात आढावा बैठक घेऊन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते तत्काळ केवायसी करावे तसेच लाभापासून वंचित शेतकऱ्यांची बँक माहिती अद्यायवत करावी असे निर्देश सर्व तहसिलदार व कृषि अधिकारी यांना दिले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत अल्प भूधारक शेतकऱ्यांना केंद्र सरकार द्वारे आर्थिक मदत म्हणून वार्षिक ६००० रुपये म्हणजे २००० रुपयाचे तीन हफ्ते बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात. याप्रमाणे योजनेच शुभारंभ झाल्यापासून आजपर्यंत ९ हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहे. परंतु सदर योजनेपासून जिल्ह्यातील बरेच शेतकरी वंचित असून काही शेतकऱ्यांना आधी लाभ मिळाला असून नंतर लाभ मिळणे बंद झाले आहे. त्याचे मुख्य कारण बँकेमध्ये दिलेली माहिती जसे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक ई. माहिती व कृषी विभागामार्फत भरण्यात आलेली माहिती यामध्ये ताळमेळ जुळत नाही. तरी सदर बैठकीत खासदार रक्षाताई खडसे यांनी सदर मुद्दा उपस्थित करून सर्व उपस्थित तहसिलदार व कृषी अधिकारी यांना सदर पात्र व योजनेपासून वंचित शेतकऱ्यांची बँक व केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर माहिती अद्यायवत करण्यात यावी तसेच आधार कार्ड अपडेट करणे तसेच सर्व शेतकऱ्यांची बँक खाती केवायसी करणेसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, जेणेकरून शेतकरी शासनाकडून येणाऱ्या कोणत्याही योजनेच्या थेट लाभापासून वंचित राहणार नाही.
*तसेच परवा झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत सदर बैठकीत पिक विम्याच्या लाभापासून शेतकरी आज्पावतो का वंचित राहिले ह्याची करणे मागवली होती व संबंधित बँक व विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यावर चर्चा करण्यात आली, तसेच जून महिन्यातील वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाई विषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली.* यावेळी बैठकीस खासदार रक्षाताई खडसे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, यांच्यासह जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, तसेच रावेर लोकसभा क्षेत्रातील तहसिलदार, कृषी अधिकारी व संबंधित बँक अधिकारी उपस्थित होते.