*महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे च्या दहीहंडीस प्रशासनाचा विरोध तरीही मनसे च्या वतीने प्रतिकात्मक दहीहंडी साजरी*-
धुळे दि.०१(प्रतिनिधी) मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख यांनी पोलिस प्रशासनाकडे दहीहंडीसाठी लेखी परवानगी मागितली होती.परंतु शासनाने दहीहंडी उत्सव साजरा करण्यास स्पष्ट मनाई आदेश दिला असल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून तसे कळविण्यात आले. तरी देखील मनसे धुळे जिल्ह्याच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी मनसेच्या धुळे जिल्हा पदाधिकारी यांना पोलिस प्रशासनाच्या वतीने जिल्हाध्यक्ष यांच्या नावाने नोटीस बजावत विरोध करण्यात आला.
त्यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख, जिल्हा सरचिटणीस अजितसिंह राजपूत ,संदीप जडे ,संतोष मिस्तरी यांनी पोलीस प्रशासनाच्या मनाई आदेश असताना देखील प्रतिकात्मक दहीहंडी फोडून तीघाडी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अँड. दुष्यंतराजे देशमुख यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका करत शासन हे पोलीस प्रशासनाचा वापर करीत हिंदूंच्या सण - उत्सव यावर जाणून-बुजून निर्बंध लादत आहे असा आरोप केला.
सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये हिंदूंच्या सर्व पारंपरिक सण-उत्सव यापुढेही मनसेच्या वतीने पूर्ण ताकदीने व उत्साहाने साजरे केले जातील, यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहेत असे मत मनसेचे जिल्हाध्यक्ष दुष्यंतराजे देशमुख यांनी व्यक्त करत ,तीघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचे मेळावे, वाढदिवस, यात्रा, आमदार ,खासदार ,मंत्री यांच्या मुलांची लग्न यांना होणारी हजारोंच्या संख्येने गर्दी चालते. त्यावेळी कोरोना चा प्रादुर्भाव होत नाही . परंतु हिंदूंचे सण उत्सव साजरे करायला घेतले की मात्र कोरोना होतो अशी जनतेच्या मनामध्ये भीती घालत जाणून बुजून निर्बंध लादले जातात.
*अशा प्रकारे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे पक्ष सुद्धा सत्तेसाठी सत्तास्वार्थी झाले असून, आयुष्यभर हिंदुत्वाच्या नावाने राजकारण केल्यावर सत्तेसाठी हिंदुत्व विरोधी भूमिका घेणारे असतील तर, महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचा आम्ही मनसेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो*
*तसेच आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील हिंदूंच्या धार्मिक भावना समजून न घेतल्यामुळे त्यांनी खूप काही वेगळे केले असे म्हणता येणार नाही. कारण त्यांनी यापूर्वी अनेकदा अशीच भूमिका घेतली आहे.*
महाराष्ट्रातील जनतेने. आता तरी जागरूक होऊन या तिघाडी सरकारला जे हिंदू व मराठी जनतेस कायम गृहीत धरत आले आहेत व नको त्यांचे लालुन चांगुल करत आले आहेत अशा पक्षांना येणाऱ्या काळात नक्कीच जगतेने धडा शिकवावा. नाहीतर या महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात चे व या भारताचे तालिबान होण्यास वेळ लागणार नाही.
*का म्हणून प्रत्येक वेळी हिंदूंवर , त्यांच्या धार्मिक, सांस्कृतिक, पारंपारिक सण - उत्सव व सोहळे यांवर अनेक अटी , शर्ती व निर्बंध लादले जातात.*?????
आम्ही या सर्व गोष्टींचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो असे मत मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड.दुष्यंतराजे देशमुख यांनी व्यक्त केले.
सदर दहीहंडी उत्सव साजरा करताना मनसेचे ॲडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख, जिल्हा सरचिटणीस अजितदादा राजपूत संदीप जडे ,संतोष मिस्त्री, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संध्या पाटील, शहराध्यक्ष अमिषा गावडे, चारुशीला खैरनार, उषा कापडणीस, रुचिता पाटील, मनसे शहर उपाध्यक्ष नीलेश गुरव , राजेश दुसाने , प्रशांत तनेजा, धुळे तालुका उपाध्यक्ष दीपक पाटील, विभाग अध्यक्ष अविनाश देवरे, रोहित नेरकर ,अमृत पाटील ,हरीश जगताप, अक्षय शिंदे, प्रज्वल चव्हाण, बापू ठाकूर, सतीश पाटील ,भूषण सोनवणे, मनोज मिस्त्री ,वाल्मिक जाधव ,चेतन रनाते ,आदी पदाधिकारी उपस्थित होते.