रंजाणे उपकेंद्रातील आरोग्य सेविकांचा निरोप समारंभात डीजे दणाणला खरा.. संगीत निनादले..मात्र शेवट होता होता अश्रूही टपकले.. पहिल्यांदाच समारंभ ठरला आगळावेगळा

 






*रंजाणे उपकेंद्रातील आरोग्य सेविकांचा निरोप समारंभात डीजे दणाणला खरा.. संगीत निनादले..मात्र शेवट होता होता अश्रूही टपकले.. पहिल्यांदाच  समारंभ ठरला आगळावेगळा ...


शिंदखेडा दि.३१(प्रतिनिधी रवि शिरसाठ): प्राथमिक आरोग्य केंद्र धमाणे अंतर्गत रंजाणे उपकेंद्रातील आरोग्य सेविका  यांचा निरोप समारंभाची सुरुवात डीजेच्या तालावर धुमधडाक्यात झाली खरी.. मात्र शेवट हा सदरील कर्मचारींच्या उल्लेखनीय कार्य व हृदयाच्या घरट्यात खोलवर केलेल्या स्नेह पूर्वक जाळे विणले गेले असल्याने नागरिकांच्या डोळ्यांतून साश्रू नयनांना वाट मोकळे करून गेला.या ह्रदय स्पर्शी सोहळ्याने   सुषमा निकम, अनिता मोरे, व भरत माळी यांना निरोप बाय..बाय न करता इथेच सेवा द्या.. म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर येऊन ठेपली होती.

याबाबत अधिक माहिती अशी,तालुक्यातील धमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रंजाणे उपकेंद्रातील आरोग्य सेविका  सुषमा निकम यांची प्राथमिक आरोग्य केंद्र बोरकुंड तर धमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत शिंदखेडा १ चे आरोग्य सेविक भरत माळी  प्राथमिक आरोग्य केंद्र विखरण च्या उपकेंद्र टेकवाडे तर धमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत शिंदखेडा १ च्या आरोग्य सेविका अनिता मोरे यांची प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी चे आरोग्य उपकेंद्रातील  कळमसरे  येथे बदली झालेली आहे

रंजाणे येथील आरोग्य उपकेंद्रातील या कार्यक्रमात डाॅ.शुभांगी म्हस्के(मेडीकल आॅफिसर), के.डी.ओतारी(आरोग्य सहाय्यक), डी.एम. गवळे (आरोग्य सहाय्यक), रंजाणे चे  सेवानिवृत्त सुपरवायझर महाले नाना,   पी.एन.जाधव, भावसार नाना, पंकज चौधरी, प्रदिप चित्ते, किर्ती सांळुखे,  शहा मॅडम, व सोनिबाई मोरे (पो.पा.रंजाणे),सुवर्णा पवार (आशा सुपरवायझर),सौ.साळुंखे ताई,वैशाली थोरात(आशा वर्कर), निर्मला बैसाणे(आशा वर्कर )मनिषा वाडीले(आशा वर्कर), व सी.एच.ओ.मंडळ,  एम.ओ.तसेच परीसरातील आशा वर्कर्स,  आरोग्य कर्मचारी, यांनी आपले मनोगत व्यक्त करून फुलगुच्छ , नारळ, व शाल देऊन निरोप देण्यात आला..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने