कृष्ण जन्माष्टमी सोहळ्यात गणपूरला हजारोंचा सहभाग गणपूर ,ता चोपडा दि.३०(प्रतिनिधी): येथे सालाबादाप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यात मोठा उत्साह दिसून आला.मांडणी केलेल्या मूर्ती व विशेष चे हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
प्रत्येक गल्ली बोळात रोषणाई करण्यात आली होती.महानुभाव उपदेशी बांधवांनी घरात ,प्रत्येक गल्लीत पन्नी बांधून रोषणाई करण्यात आली होती ,तर मुख्य चौकात सार्वजनिक सोहळा पार पडला.रात्री बारा वाजता कृष्ण जन्म सोहळ्याचा प्रसाद वाटप करून सोहळ्याची सांगता झाली.