*शिंदखेडा तालुक्यातील जवळच असलेल्या पाटण गावात धाडसी घरफोडी, १८ तोळे सोने, रोकड लंपास*..गावात प्रथम च एवढी मोठी घटना..24तास उलटूनही तपास शून्य*








 *शिंदखेडा तालुक्यातील जवळच असलेल्या पाटण गावात धाडसी घरफोडी, १८ तोळे सोने, रोकड लंपास*..गावात प्रथम च एवढी मोठी घटना..24तास उलटूनही तपास शून्य*

शिंदखेडा तालुका प्रतिनिधी:-( यादवराव सावंत )

  पाटण येथे राजेंद्र पवार यांच्या कडे तब्बल 18 तोळे सोने चोरी झाली आहे.घटनेने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रविवार दि.29रोजी रात्री पाटण गावातील विठ्ठल मंदिर चौक परिसरात राजेंद्र पवार पत्नी व मुलासह त्यांच्या वडिलोपार्जित घरात राहतात .राजेंद्र पवार हे आपल्या परिवारासह रात्री घरातील सगळे पुढच्या खोली मध्ये झोपले असता चोरट्याने मागील दरवाजाचा कडी तोडून आत प्रवेश करून चोरट्याने  कपाटात ठेवलेले १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 9 लाखाचा ऐवज चोरून नेल्याचे घटना घडली .

राजेंद्र पवार हे आपल्या परिवार सह पुढच्या खोलीमध्ये झोपले असताना घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. चोरट्यांनी माज घरातील कपाट आणि किचनमधील कापाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले होते. राजेंद्र पवार हे सकाळी उठले असता, त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानी लागलीच पत्नी रेखाबाईस व मुलगा हिमांशू यांना चोरी झाल्याचे सांगितले. चोरट्यांनी त्यांच्या पत्नीचे सोन्याचे चपली हार ५० ग्राम, हार २५ श्राम, मंगळपोत २२ ग्राम, कानातील तॉगल २५ ग्राम, कानातील काप २५ ग्राम, टाप्स जोड ६ ग्राम, कानातील वेल जोड 3 ग्राम, अंगठी ५ ग्राम, 

फ्यान्सी अलंकार ४ ग्राम सोन्याचे मनी मंगळसूत्र १२ ग्राम २० भार चांदीच्या साखळ्या दोन जोड असे सोने आणि रोकड असा सुमारे ९ लाखांचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला आहे.


घटनेची माहिती मिळताच शिंदखेडा पोलीस सपो निरीक्षक गजानन गोटे यांनी  लागलीच घटनास्थळी जाऊन पाहणी केली. *धुळे येथील श्वान*

धुळे यातील श्वान पथकातील श्री.काजी व पिंजारी यांच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते .

 तसेच ठसे तज्ञांच्या चीही मदत घेन्यात आली .ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले त्यात श्वान यांनी घरापासून गावातील ग्राम पंचायत चौकापर्यंत जाऊन तेथेच घुटमळत राहिले.यामुळे देखील काही निष्पन्न न झाल्याचे बोलले जात आहे. सायंकाळी उशिराने पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी रेखाबाई राजेंद्र पवार यांनी शिंदखेडा पोलिसात अज्ञात चोरांना विरोधात फिर्याद दिली. 

24 तास उलटूनही तपास शून्य असल्याने या चोरीने शिंदखेडा पोलिसां पुढे मोठे आव्हान उभे केले आहे ,सदर चोरीचा प्रकार बघता  चोर सराईत असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे .

*रात्रीची गस्तीची मागणी*  गावात या पूर्वीही गावात लहान मोठ्या अनेक चोऱ्या झाल्या आहेत.तसेच गाव मुख्य रस्त्याला लागून असल्याने अनेकदा गावातुन शेतकऱ्यांचे पशुधन ही चोरी झाल्याच्या घटना घडल्या असल्याने नागरिकान मधून पोलिसांनी गस्त वाढविण्यासाठी ची मागणी होत आहे.परिसरातील अनेक चोऱ्या घटनेतील आरोपी सापडण्याचे प्रमाण व तपासाची प्रगती शून्य असल्याने नागरिकांना मधून नाराजी व्यक्त होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने