चोपडा एकलव्य संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आढावा बैठक संपन्न




चोपडा एकलव्य संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आढावा बैठक संपन्न

 चोपडा दि.०२(प्रतिनिधी) दिनांक ०१/०८/२०२१ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती एकलव्य संघटनेच्या वतीने शासकीय विश्राम गृह चोपडा येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष मसुधाकरराव वाघ यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये साजरी करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त चोपडा येथे एकलव्य संघटना आढावा बैठक एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष मा सुधाकरराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.  बैठकीची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन  जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते  करून करण्यात आली. व तसेच बैठकीला उपस्थित असलेल्या चोपडा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व आदिवासी भिल्ल समाज बांधव यांच्याशी संवाद साधला व उपस्थित समाज बांधवाच्या सर्व प्रमुख समस्या समजू घेतल्या तसेच उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन ही केले. जिल्हाध्यक्ष यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कोण होते व  त्यांनी त्यांचा इतिहास कसा घडवला हे त्यांच्या शैलीतून  त्यांनी लक्षात आणून दिले त्यांसबरोबर समस्या वरही बोलत असतांना  सर्व जळगांव जिल्ह्यातील तालुका कमिटी बैठक घेत असतांना सर्व समाज बांधवाच्या समस्या ह्या सगळ्या एक समान असल्याचे ते म्हणाले. ह्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपल्याला काही दिवसात शासन व प्रशासकीय स्थरावर आपल्या हक्कासाठी आंदोलनच्या माध्यमातून सोडून घ्यावे लागेल. असेही त्यांनी सांगितले व त्यांसबरोबर एकलव्य संघटना तालुका कमिटी वर नविन कार्यरते यांची नियुक्ती करण्यात आली युवा तालुकाध्यक्ष सुशिल सोनवणे तालुका सचिव नामदेव पवार कार्याध्यक्ष अशोक सोनवणे तालुका सल्लागार सुभाष भिल तालुका संपर्क प्रमुख छिटू भिल्ल तालुका खजिनदार बापू भिल्ल ह्या सर्व नविन पदाधिकारी यांची निवड उपस्थित सर्वांच्या सहमतीने झाली तसेच आज रोजी जळगांव जिल्हाध्यक्ष मा सुधाकरराव वाघ यांचे सर्वांच्या सहभागाने साध्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्यात आले यावेळी एकलव्य संघटना युवा जिल्हाध्यक्ष रविभाऊ सोनवणे विध्यार्थी संघटना जिल्हा प्रमुख निवृत्ती पवार तालुकाध्यक्ष सखाराम सोनवणे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे तालुका संघटक आप्पासाहेब आहिरे व आदिवासी भिल्ल समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने