आनंदीबाई बंकट शाळेत अनेकांना हलविले.. दोन जण पाण्याच्या विळख्यात..एसडीआरएफचे ३० जणांचे पथक दाखल..न.प.कर्मचारींची टीम दिवसभर मदतकार्यात..शेती पिकांचेही अतोनात नुकसान..*














 *चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान.. सर्वत्र हाहाकार.. आनंदीबाई बंकट शाळेत अनेकांना हलविले.. दोन जण पाण्याच्या विळख्यात..एसडीआरएफचे ३० जणांचे पथक दाखल..न.प.कर्मचारींची टीम दिवसभर मदतकार्यात..शेती पिकांचेही अतोनात नुकसान..* 

चाळीसगाव  दि.३१(प्रतिनिधी),

हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रात अतीवृष्टीचा इशारा दिला असून सोमवारी रात्री चाळीसगाव तालुकापरिसरात झालेल्या पावसामुळे तितूर व डोंगरी नद्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात दोन जण अडकल्याचा अंदाज असून चाळीसगाव तहसिलदार अमोल मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एसडीआरएफ पथकाची मागणी केली. तसेच मन्याड प्रकल्प पूर्ण भरल्याने गिरणा नदीपात्र तसेच जामदा बंधाऱ्यातून किमान १५०० क्यूसेक प्रवाह आहे. त्यामुळे तितूर, डोंगरी व गिरणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे तर कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतुक विस्कळीत झाली असून हि वाहतूक नांदगाव शिवूर बंगला मार्गाने वळविण्यात आली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.


  या पुरामुळे चाळीसगाव शहरातील नदीकाठच्या परिसरातील नागरी वसाहतीत पाणी शिरले आहे. या पुरात चाळीसगाव शहरातील दोन इसम अडकले असल्याचा अंदाज असून तीन ते चार गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे तेथे संपर्क होउ शकत नसल्याचे चाळीसगाव तहसिलदार अमोल मोरे यांनीचाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे अनेक नद्या,नाल्यांना मोठा पूर आलेला आहे. शहरातील बहुतांश भागाला महापुराच्या पाण्याचा वेढा पडलाआहे. 

दरम्यान, प्रशासनाने नदीकाठालगतच्या नागरिकांसाठी नेताजी चौकातील आनंदीबाई बंकट विद्यालयात मदत कक्ष सुरु केला आहे. न. पा. ची टीम यासाठी सर्तक करण्यात आली आहे. ग्रामीणभागातही शाळांमध्ये नागरिकांना हलविण्यात येत

आहे, शहर व ग्रामीण भागात महापूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने महसूल प्रशासनाने एसडीआरएफ पथकाची मागणी केली होती. त्यानुसार धुळे येथील ३० जणांचे पथक येथे दाखल झाले आहे. कन्नड झाले. घाटातील दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले आहे. कन्नड घाटातील वाहतूक थांबविण्यात आली आहे. प्रवाशी वाहने व मालवाहू वाहने नांदगाव व सिल्लोडमार्गे जळगावकडे वळविण्यात आली आहे.

ग्रामीण भागातही तातडीची मदत पोहचविण्याचे प्रशसनासमोर आव्हान आहे. अतिवृष्टीमुळे कपाशी, मका, कडधान्ये, बाजरी, ज्वारी, फळबागांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने