शिंदखेडा तालुक्यातील वाडी- शेवाडी धरणाला जि.प सदस्य विरेंद्र गिरासेची पाहणी - कालव्याचे काम जलदगतीने करा*

 





*शिंदखेडा तालुक्यातील वाडी- शेवाडी धरणाला जि.प सदस्य विरेंद्र गिरासेची पाहणी - कालव्याचे काम जलदगतीने करा*             शिंदखेडा दि.०४ ( यादवराव सावंत    तालुका प्रतिनिधी-);तालुक्यातील वाडी शेवाडी  धरण तालुक्यातील शेतकऱ्याला वरदान ठरणार आहे म्हणून कै .आमदार ठाणसिंग जिभाऊ यांनी आमलात आणण्यासाठी प्रयत्न केले होते अखेर त्यांनी साकार करुन त्यास विद्यमान आमदार व माजी मंत्री जयकुमार रावल यांनी पुर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न शासनदरबारी केले. काही कालव्याचे काम जलदगतीने करण्यात यावे त्यासाठी तालुक्यातील बहुतेक शेती ओलिताखाली येणार आहे व शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे. हयापुर्वी आमदार रावल यांनी पायी परिक्रमा करुन दुसाणे ते पाटण हया ठिकठिकाणी सुमारे चौतिस बंधाऱ्याची निर्मिती झाली. तालुका हरितमय करण्याचे त्यांचे स्वप्न जवळपास पुर्णत्वास येत आहे . त्याचप्रमाणे आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली  उजव्या कालव्याची पाहणी करण्यासाठी सवाईमुकटी ते रामी बारा किलोमीटर अंतरावरील पायी चालत पाहणी भाजपाचे जि . प . सदस्य विरेंद्रसिंग इंद्गसिंग गिरासे .यासह कृ .उ . बा .समितीचे संचालक रविंद्र देसले , सरपंच मनोज पाटील ,जेष्ठ शेतकरी बी . एच . पाटील, मनोज सोमवंशी , तामथरे सरपंच योगेंद्रसिंग गिरासे , ग्रामपंचायत सदस्य मनोहर चौधरी , रवींद्र गिरासे , रवींद्र चौधरी ,बाळा गिरासे , मयुर चौधरी आदिसह शेतकऱ्यानी भेट दिली.या कालव्याचे काम अतिशय जलदगतीने सुरू आहे ,दिड महिन्यात काम पुर्णत्वास येणार असल्याचे पाठबंधारे विभागाचे अभियंता वाडीले , सगळे . राऊत , राणे यांनी सांगितले, यामुळे तामथरे , सवाईमुकटी , दराणे , रोहाणे , चिमठावळ यागावांना शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी फायदा होणार आहे.हयासाठी अधिकारी वर्गाचे जलदगतीने होणाऱ्या कामाबद्दल जि . प . सदस्य विरेंद्रसिंग गिरासे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे समाधान व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने