*चोपड्यात पत्रकाराला जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी.. एका विरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल*
चोपडा दि.३१(प्रतिनिधी):रामपुरा भागातील रहिवासी पत्रकाराला एकाने जबर मारहाण करून जीवे मारण्याची दिल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे पत्रकारास उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.याबाबत शहर पोलिसात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे
या घटनेविषयी प्राप्त माहितीअशी की, रामपुरा भागातील रहिवासी पत्रकार हेमकांत बळीराम गायकवाड यांच्या घराच्या पत्री शेडवर शेजारील इसम गणेश रमेश जाधव याने दगड मारला असता पत्रावर दगड का फेकतो असे विचारण्यास गेलाअसता गणेश जाधव यास राग येवून त्याने लाकडी पाटीने पत्रकारास जबर मारहाण केली. व तुला येथे राहू देणार नाही,जीवे ठार मारू अशी धमकी दिली.
याप्रकरणी शहर पोलिसात हेमकांत बळीराम गायकवाड यांचे तक्रारीवरूनगणेश जाधव यांचे विरुद्ध पोलीसात पनाका रजि. 440/2021 भादंवि कलम 323,504, 506, प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे पुढील तपास पोहेकाॕ संतोष पारधी हे करीत आहेत.