*चाळीसगाव तालुक्यातील तुफानी ढगफुटी जवळपास १५ गावांना पाण्याचा वेढा.. प्रचंड वित्तहानीसह अनेक मुके जनावरें मृत्यूमुखी.. नदीकाठच्या गावांना* *सतर्कतेचा इशारा.. बचावकार्यात प्रशासनासह आमदारही सामील.. कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूकीच्या मार्गात बदल..**









चाळीसगाव तालुक्यातील तुफानी ढगफुटी जवळपास १५ गावांना पाण्याचा वेढा.. प्रचंड वित्तहानीसह अनेक मुके जनावरें मृत्यूमुखी.. नदीकाठच्या गावांना* *सतर्कतेचा इशारा.. बचावकार्यात प्रशासनासह आमदारही सामील.. कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूकीच्या मार्गात बदल..** 

चाळीसगाव दि.३१(प्रतिनिधी): तालुक्यातील अनेक गावांमध्ये धुव्वाधार तुफानी पाऊस  

पडल्याने कोदगांवसह अनेक गावांना पाण्यानें वेढले असून मुके जनावरें मृत्यूमुखी पडले आहेत.प्रचंड वित्त हानी झाली असून युध्दपातळीवर बचावकार्य सुरू असून  प्रशासनाने कंबर 

कसली आहे.दरम्यान अनेक नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली असल्याने नदीकाठच्या लोकांना सतक्रतेचा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे. तसेच कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक मार्ग वळविण्यात आला आहे.

 परिसरात ढगफुटी सदृश

पाऊस  पडून चाळीसगाव शहरातील

तितुर नदीसह तालुक्यातील वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे,

जामडी, कोंगानगर, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणे,कोदगांव

सिम, मजरे आदी परिसरातील गावांना पुराने  वेढले

आहे.


गवताळा परिसरातील डोंगर भागात रात्रीपासून अचानक जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे तितुर व डोंगरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून अचानकपणे पडलेल्या या पावसामुळे जनावरे, शेती औजारे •वाहून गेली असून मनुष्यहानी देखील झाली असल्याची माहिती मिळत आहे.


 *कन्नड घाटात देखील दरड कोसळली* 


कन्नड घाटात देखील दरड कोसळल्याने वाहतूक बंद आहे. स्वतः प्रांताधिकारी, तहसीलदार व आमदार प्रशासनाला सोबत घेऊन आज सकाळ पासून बचावकार्यात सहभागी असून, अजून मोठी कुमक मागविण्यात येत आहे.


औरंगाबाद जाण्यासाठी पर्यायी घारगाव रस्ता वापरावा तर औरंगाबादहून येण्यासाठी अजिंठा-जळगाव महामार्ग वापरावा, असे पोलिस निरीक्षक भागवत पाटील, पोलिस निरीक्षक यांनी सांगितले.

 *तालुक्यातील पावसाची स्थिती*

चाळीसगांव 92 मि.मी, बहाळ 47 मि.मी. मेहुणबारे 15 - - मि.मी., हातले 80मि.मी., तळेगांव 145 मि.मी, शिरसगांव - 70मि.मी., खडकी 97 मि.मी. आजचे पर्जन्यमान 546, - सरासरी पर्जन्यमान 78.00, पर्जन्यमान 690,

 *बचावकार्यात आमदार तळ ठोकुन* 

रात्री ढगफुटी सदृश पाऊस पडून चाळीसगाव शहरातील तितुर नदीसह वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे, जामडी, कोंगानगर, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणे सिम, मजरे आदी परिसरातील गावांना पुराने वेढले आहे, अनेक गावांचा संपर्क तुटला असून अचानकपणे पडलेल्या या पावसामुळे जनावरे, शेती औजारे वाहून गेली असून मनुष्यहानी देखील झाली असल्याची माहिती मिळत आहे. कन्नड घाटात देखील दरड कोसळल्याने वाहतूक बंद आहे. मी स्वतः प्रांताधिकारी, तहसीलदार व प्रशासनाला सोबत घेऊन आज सकाळ पासून बचावकार्यात सहभागी असून, अजून मोठी कुमक मागविण्यात येत आहे. माझी सर्व चाळीसगाव वासीयांना विनंती आहे की या अचानकपणे आलेल्या संकटाचा सामना आपल्याला सर्वांना एक होऊन करायचा आहे. आपापल्या पातळीवर जे काही मदतकार्य करता येईल, माहिती देता येईल ती द्यावी.असे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी आवाहन केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने