*संत जगनाडे महाराज मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा*
*चोपडा* दि.३१(प्रतिनिधी) संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा व संत जगनाडे जगदीश गोपाल गोशाळा व गो अनुसंधान संस्था चोपडा यांचे संयुक्त विद्यमाने चोपडा श्रीराम नगर येथील संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिरात 30 ऑगस्ट 20 21 रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरात आकर्षक मांडणी करून भाविकांनी व समाज बांधवांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी श्रीकृष्ण भगवंताची गीते, गवळणी, भावगीते, हरी भजन म्हणून रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी आरती म्हणून ,पाळणा गाऊन व कृष्ण नामाचा जयघोष करण्यात आला. हभप गोपीचंद महाराज, ह.भ.प. देवरे महाराज, ह.भ.प. नेरकर आप्पा ,ह भ प तेजस महाराज , हभप दिलीप महाराज संस्थेचे अध्यक्ष के.डी. चौधरीसर, सचिव भिका खंडू चौधरी, सहसचिव प्रशांत सुभाष चौधरी व गौ शाळेचे अध्यक्ष श्री देवकांत के. चौधरी ,पंडित अजय शर्मा, संस्थेचे विश्वस्त श्री महेन्द्र कुमार आनंदराव चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी हर्षदा महेंद्र चौधरी, पुन्डलिक धाकू मराठे व त्यांच्या धर्मपत्नी, धनराज प्रल्हाद मराठे व त्यांच्या धर्मपत्नी सौ ज्योती ताई मराठे, सुर्यकांत के.चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ० प्रिया सूर्यकांत चौधरी सौ० नम्रता प्रशांत चौधरी, जगदिश मिस्तरी, अशोक पाटील व त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुरेखा पाटील तसेच असंख्य भाविक महिला व पुरुशान्ची उपस्थिती लक्षणीय होती.