*मेलाणे ग्रामपंचायतीत १४व्या वित्त आयोगातून कामेच झाले नसल्याने विकास निधी गेला कुठे?गावकऱ्यांची तक्रार..३ सप्टेंबरला चौकशी समिती करणार तपासणी..*

 





*मेलाणे ग्रामपंचायतीत १४व्या वित्त आयोगातून कामेच झाले नसल्याने विकास निधी गेला कुठे?गावकऱ्यांची तक्रार..३ सप्टेंबरला चौकशी समिती करणार तपासणी..* 


 चोपडा दि.३१(प्रतिनिधी): तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये प्रचंड घोळ होण्याचे प्रमाणावर वाढले असून चौकशी समिती नेमुन चौकशी करण्याची नामुष्की पंचायत समिती कार्यालयांवर ओढवली आहे.मात्र चौकशीत भोपळाच् बाहेर येत असल्याचे गौडबंगाल काय? असा प्रश्न जाणकारांनी व्यक्त केला आहे.अडावद पाठोपाठ मेलाणे येथे १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची दि ३ रोजी चौकशी करण्यात येणार आहे.अजून अधिकाऱ्यांचा ताफा गावात धडकणार असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

मेलाणे तालुका चोपडा येथे ग्रामपंचायतीमार्फत १४ व्या वित्त आयोगातून झालेल्या विकास कामांमध्ये गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी बी. एस. कोसोदे यांच्याकडे केली होती. ग्रामस्थांच्या तक्रारी अर्जाची दखल घेऊन गटविकास अधिकाऱ्यांनी सदर तक्रार बाबत चौकशी समिती नेमलेली आहे.


सरपंच आणि ग्रामसेवक यांना गटविकास अधिकारी यांनी लेखी पत्र पाठवून दि. ३ रोजी चौकशीकामी लागणारे सर्व दप्तर उपलब्ध करून द्यावे असेही कळविले आहे. मेलाने येथील ग्रामस्थांनी २०१६-१७ ते २०१९ २० या आर्थिक वर्षात १४ वा वित्त आयोगातून प्राप्त निधीत मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार केलेली आहे. तक्रार करणाऱ्या ग्रामस्थांमध्ये प्रताप पावरा, गंगाराम पावरा, करण पावरा, अशोक पावरा, नामसिंग पावरा, सचिन पावरा यांनाही गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी वेळी हजर राहण्याचे कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने