मजुराच्या हातून चुकीने फोन" पे"ने १० हजारांची रक्कम दुसऱ्या च्या खात्यात ट्रान्स्फर.. सामाजिक कार्यकर्ते राहुल पवारने तीनं दिवसांनी पैसे मिळवून दिले परत..!

 




मजुराच्या हातून चुकीने फोन" पे"ने १० हजारांची रक्कम दुसऱ्या च्या खात्यात ट्रान्स्फर.. सामाजिक कार्यकर्ते राहुल पवारने तीनं दिवसांनी पैसे मिळवून दिले परत..!

अमळनेर दि.३१(प्रतिनिधी-दीपक प्रजापती)-  तालुक्यातील रुंधाटी गावातील श्री. विजय किसन पाटील या गरीब हात मजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलाकडुन चुकून फोन पे द्वारे दहा हजार रुपये आईच्या  अकाउंट वरती पैसे टाकताना चुकून दे पैसे दुसऱ्याच्या अकाउंट वरती दिनांक २७ तारखेला पाठवले गेले नंतर तीन दिवस फिरून त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती मिळत नव्हती तर त्यांनी झालेली घटना ही राहुल पवार यांना दिनांक 30 तारखेला सविस्तर माहिती सांगितली तर राहुल पवार यांनी झालेली घटना याची तात्काळ दखल घेऊन सोबत त्यांचे सहकारी मित्र दिपक प्रजापती , विनोद पवार व दर्शन सोनार यांना सोबत घेतले तसेच बँकेची माहिती घेऊन मिळालेल्या माहितीनुसार चोपडा येथील चि. राजेंद्र सुमसिंग बारेला यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना झालेली घटनेची सदर माहिती सांगितली राजेंद्र बारेला यांनी ते पैसे परत केले. तसेच श्री. विजय पाटील यांनी  मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद चे जळगाव जिल्हाध्यक्ष राहुल पवार  व राजेंद्र बारेला यांचे आभार मानले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने