मठगव्हाण येथे कोविड लसीकरण सत्र उत्साहात
अमळनेर दि.३१(प्रतिनिधी दिपक प्रजापती)- तालुक्यातील मठगव्हान येथे पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्र मठगव्हाण येथे कोविड लसीकरण राबविण्यात आले . सत्रात ज्येष्ठ नागरिक . अपंग . एक महिला एक पुरुष अशा प्राथमिकतेने अत्यंत शिस्तबद्ध व शांतपूर्व वातरणात सत्र पार पडले . या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.रोशन राजपूत डॉ.संजय पाटील डॉ.घनश्याम पाटील आरोग्य सेवक गजानन ढाकणे . आरोग्यसेविका एस.बी.गीते , आशासेविका छायाबाई पाटील , व मठगव्हाण येथील तरुण मित्र मंडळ तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते व आदींनी लसीकरण सुव्यव्यवस्थित पार पाडण्यासाठी सहकार्य केले