चांदवड नगरपरिषदतर्फे कीटकनाशक फवारण्यांना वेग
चांदवडदि.०१-(सुनील अण्णा सोनवणेां)सुनीलदवड शहराच्या काही भागांमध्ये डासांचे प्रमाण खूप वाढलेले आहे.पांढरे काळे पट्टे असलेले डास दिसत असल्याचे स्पष्ट झालेआहे.काही घरांमध्ये ताप, डोकेदुखी,हातपाय दुखणे अश्या चिकणगुनिया सदृश आजाराने काही नागरिक त्रस्त आहेत.
चांदवड शहरातील वरचे गाव,घोडके नगर,गुरुकुल कॉलोनी,महालक्ष्मी नगर परिसरात नगरपरिषद तर्फे कीटकनाशक फवारणी जोरदार सुरू आहे.मुख्याधिकारी श्री अभिजित कदम,स्वच्छता अभियंता श्री सत्यवान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मच्छिन्द्र जाधव व इतर कर्मचारी फवारण्या करताना दिसत होते.