सुमीत देशमुख यांची युवा सेनेच्या शिंदखेडा उप तालुका युवा अधिकारी पदी निवड....






 सुमीत देशमुख यांची युवा सेनेच्या शिंदखेडा उप तालुका युवा अधिकारी पदी निवड.....

शिंदखेडा :-दि.०१( प्रतिनिधी रवि शिरसाठ )


.समाजिक कामात नेहमी अग्रेसर असणारे, शेतकरी कष्टकऱ्यांसाठी झटणारे व शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनेपासून निष्ठावंत काम करत असल्याने पक्षाच्या वरिष्ठ थरावरुन दखल घेत शेवाडे ता. शिंदखेडा जि. धुळे येथील सुमीत देशमुख यांची शिवसेनेच्या युवा सेनेच्या शिंदखेडा उप तालुका युवा अधिकारी पदी निवड करण्यात आली. 


राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते युवासेनाप्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना धुळे जि. शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे येथील सुमीत दिलीप देशमुख यांची शिंदखेडा उप तालुका युवा अधिकारी या पदावर नेमणूक करण्यात आली आहे.  तसे नियुक्ती पत्र युवा  धुळे जिल्हा विस्तारक अमित पाटील, धुळे जिल्हा युवा अधिकारी अँड. पंकज गोरे यांच्या हस्ते देण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शिवसेनेच्या उप जिल्हाप्रमुख प्रमुख शानाभाऊ सोनवणे, शेवाडे सरपंच बबलु कोळी, रनजित भाऊ साहेब पं.स सदस्य शेवाडे, बेहडचे सरपंच रावसाहेब गिरासे, युवा सेना तालुका प्रमुख दोंडाईचा आकाश कोळी, वाडीचे सरपंच गोविंदा नगराळे, चिमठाण्याचे डॉ. भरत राजपूत, देंगाव चे कमलाकर बागले, मालपुरचे निखील खैरनार, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अनिल गायकवाड, दिपक मोरे सर पं.स. सदस्य शिंदखेडा सुदर्शन पाटील लामकानी शिवसेना तालुकाप्रमुख महावीर जैन, बळसाने शिवसेना उपतालुकाप्रमुख यांच्यासह समाजिक, राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी व शेवाडे येथील तरुणांनी त्यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी देशमुख म्हणाले की, पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या कामाची दखल देत एक प्रकारे मला न्यायच दिला आहे. याचा मला सार्थ अभिमान वाटतो आहे. माझ्यावर विश्वास दाखवत पद दिले आहे. चोक पणे काम करेल असे त्यांनी बोलतांना सांगितले..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने