नुकताच जन्मलेल्या बाळास टेरेसवरून फेकले.. निर्दयी माता निघाली १५ वर्षे वयाची .. ह्रदय* *पिळवटून टाकणारी घटना.. कायं झालं असेल कमी नशिबी बाळाचे?*

 



*नुकताच जन्मलेल्या  बाळास टेरेसवरून फेकले.. निर्दयी माता निघाली १५ वर्षे वयाची .. ह्रदय* *पिळवटून टाकणारी घटना.. कायं झालं असेल कमी नशिबी बाळाचे?* 


विरार दि., 04  : मुंबईजवळील विरारमध्ये (virar) एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका नवजात बाळाला इमारतीच्या टेरेसवरून खाली फेकण्यात आले आहे. या बाळाची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेच्या यशवंत नगर परिसरातील तुलिप सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीचे इमारतीच्या टेरेसवरून नुकताच जन्मलेल्या स्त्री जातीच्या बाळाला फेकुन दिले. सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांनी अर्भक आढलून आले आणि एकच खळबळ उडाली. रहिवाशांनी तातडीने याबद्दलची माहिती पोलिसांना कळवली.

त्याआधी स्थानिक नागरिकांनी बाळाला एका कपड्यात गुंडाळून नजीकच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. लहान बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. इवल्याशा जिवाला इमारतीच्या टेरेसवरून कुणी फेकले असावे, याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांपैकी कुणीही हे कृत्य केलं नसल्याचं सांगितलं. उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी बाळाला. वाचवण्याचा प्रयत्न केला. पण यात त्यांना यश आले नाही. गंभीर जखमी झाल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अर्नाळा सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. मात्र हे नवजात बाळ नेमकं कोणी फेकलं हे अजूनही स्पष्ट झाले नाही. अर्नाळा सागरी पोलीस घटनेचा सखोल तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. याच परिसरात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मातेनं हे कृत्य केल्याचं समोरं आलं. घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने