आज १२वी चा निकाल.. आपल्या मोबाईलवर पाहा घरबसल्या.. कसे आणि कुठे शोधायचा ..ते वाचा सविस्तर बातमीत..*

 



*आज १२वी चा निकाल.. आपल्या मोबाईलवर पाहा घरबसल्या.. कसे आणि कुठे शोधायचा ..ते वाचा सविस्तर बातमीत..* 

नाशिक दि.०३(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सण 2021 या वर्षीचा 12वीचा निकाल 3 ऑगस्ट या तारखेला दुपारी 4 वाजता लागणार आहे.

 

राज्यातील बारावीचा निकाल केव्हा लागणार?’ हा प्रश्न गेले काही दिवस सतत कानावर पडत होता तो आता संपणार आहे. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालाची तारीख निश्चित झाली आहे. उद्या अर्थात मंगळवार ३ ऑगस्ट रोजी हा निकाल जाहीर केला जाणार आहे. ऑनलाईन जाहीर होणार हा निकाल दुपारी ४ वाजता लागणार आहे.


गेली अनेक महिने सुरु असलेल्या कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविद्यालये बंद होती. ऑनलाईन पद्धतीने मुलांची लेक्चर्स पार पडली असली तरीही कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारे यावर्षी बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या वेटेजवर तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर बारावीचे गुण ठरवण्याचा फॉर्म्युला सरकारने काढला होता. त्याच निकषानुसार आता बारावीचा निकाल लावण्यात आला आहे.

आज चार वाजता जाहीर होणार हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन बघता येणार आहे. खालील दिलेल्या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.


https://msbshse.co.inhscresult.mkcl.org


mahresult.nic.in


www.mahresult.nic.in


https://msbshse.co.in


राज्याच्या शिक्षण मंत्री वर्ष गायकवाडी यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंबंधीची घोषणा केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने