सेनेतून हकालपट्टी झालेले माजी आ. कैलास पाटील महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाचे घटक नाहीत.. ज्या पक्षाने आमदार पदाचा सन्मान दिला त्यांच्याच पाठीत खंजीर खुसणाऱ्यांना कोणताही पक्ष थारा देतांना दहा पाऊले पुढे विचार करतो असा खोचक टोला शिवसेना तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी लगावला आहे.*




 *सेनेतून हकालपट्टी झालेले माजी आ. कैलास पाटील महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाचे घटक नाहीत..  ज्या पक्षाने आमदार पदाचा सन्मान दिला त्यांच्याच पाठीत खंजीर खुसणाऱ्यांना कोणताही पक्ष थारा देतांना दहा पाऊले पुढे विचार करतो असा खोचक टोला शिवसेना तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी लगावला आहे.* 


चोपडा दि.०३(प्रतिनिधी): माजी आमदार कैलास पाटील हे महाविकास आघाडीचे घटक नाहीत त्यांची दि. १४ ऑक्टोबर २०१९ रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी झालेली आहे. ते राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात उपस्थित राहून मी महाविकास आघाडीचा कार्यक्रम असल्याने उपस्थित आहे, असे सांगतात. परंतु त्यांनी सांगावे ते महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाचे घटक आहेत? असा सवाल शिवसेनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दि. २ रोजी सायंकाळी ६ वा शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

कैलास पाटील यांनी विधानसभा भाजपच्या निवडणुकीत बंडखोर उमेदवाराचा जाहीर प्रचार केला ते तालुक्याने पाहिले आहे. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीस महाविकास आघाडीत थारा देतांना दहा पाऊले पुढे विचार करून स्थान द्यावे.आणि कोणताही पक्ष पक्षघात करणाऱ्यांचा सखोल अभ्यास पूर्ण विचार करतेच . ज्यांना पक्षाने आमदार पद भूषविण्यापर्यंत मान दिला.त्या पक्षालाच ठेच द्यावी याला कायं म्हणावे असा प्रति सवालही राजेंद्र पाटील यांनी यावेळी केला.

 तसेच माजी आमदार कैलास पाटील यांच्यामुळेच तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिवसेनेची सत्ता निसटली असल्याचा आरोप तालुका प्रमुख राजेंद्र पाटील यांनी  केला आहे. 

यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख विकास पाटील, माजी उपसभापती एम. व्ही.पाटील, शहर प्रमुख आबा देशमुख, तालुका संघटक सुकलाल कोळी, दिव्यांक सावंत, दीपक चौधरी, सुनील बरडीया, विपीन जैन, सुनील पाटील, गणेश पाटील, प्रवीण जैन आदी उपस्थित होते.

2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने