माहिती देण्यास टाळाटाळ केली म्हणून ग्रामसेवकास 20 हजार रुपयाचा दंड


 


माहिती देण्यास टाळाटाळ केली म्हणून ग्रामसेवकास 20 हजार रुपयाचा दंड

शिरपूर दि.०३(प्रतिनिधी) - 

शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत दहिवद येथील तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक यांनी २० हजार रुपये दंडाची शास्तीची कारवाई केली आहे. या महिन्यात तालुक्यातील दंडात्मक कारवाई होणारे हे दुसरे ग्रामसेवक आहेत.

 शिरपूर तालुक्यातील सक्रिय माहिती अधिकार कार्यकर्ता महेंद्र प्रेमसिंग जाधव यांनी तालुक्यातील दहिवद ग्रामपंचायत माहिती अधिकारान्वये माहितीची मागणी सन २०१७ मध्ये केली होती मात्र सदर अर्जाच्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही न करता तत्कालीन ग्रामसेवक ए. बी .पवार यांनी याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली होती.  सदरच्या विषयात ग्रामपंचायत यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करून ग्रामपंचायतच्या उपकर वसुली मध्ये अक्षम्य दुर्लक्ष करून उपकरांच्या वसुलीत कर्तव्यात कसूर केला होता. याबाबत माहिती अधिकारातून माहिती मागितली असता ती देण्यास टाळाटाळ करण्यात आली आणि संबंधित अर्जाच्या  प्रथम आणि  द्वितीय अपिलाच्या सुनावणीत झालेल्या आदेशांची देखील पायमल्ली करण्यात आली होती. राज्य माहिती आयोगाने आदेश देऊन देखील माहिती उपलब्ध करून दिली गेली नाही म्हणून आयोगाने सन २०२१ मध्ये अंतिम आदेश करून माहिती देण्याचे आदेश केले होते. यानंतर ग्रामसेवक यांनी अर्जदार यांना थोड्याफार प्रमाणात माहिती पुरवून माहिती दिल्याचे खुलासा आयोगास सादर केला होता .मात्र माहिती अधिनियम २००५ मधील कलम ७(१) चा भंग झाला असून आपण मुदतीत माहिती पुरवली नाही आणि सदरची माहिती देण्यास जवळपास ३७ महिन्यांच्या उशीर केला आणि म्हणून अपीलआर्थिस माहितीपासून वंचित राहावे लागले .जन माहिती अधिकारी यांनी आपली जबाबदारी पार न पाडता कर्तव्यात कसूर केला म्हणून राज्य माहिती आयोग खंडपीठ यांनी सदर ग्रामसेवकास २० हजार रुपयांच्या दंडात्मक कारवाईची  आदेश केले असून सदरची रक्कम त्यांच्या मूळ वेतनातून दोन समान हप्त्यात कपात करून याबाबत आयोगास करण्याबाबत आदेश पारित केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने