आरटीआय कार्यकर्ते अनिता गिरासे सह तिन्हींचा अटकपूर्व जामीन मंजूर*..टाकरखेडा येथील माजी उपसरपंच धिरेंद्र सिसोदिया आत्महत्ये प्रकरण
शिंदखेडा दि.०१(प्रतिनिधी)*आरटीआय कार्यकर्ते अनिता गिरासे सह तिन्हींचा अटकपूर्व जामीन मंजूर* = टाकरखेडा येथील माजी उपसरपंच धिरेंद्र सिसोदिया आत्महत्ये प्रकरणी दाखल गुन्ह्यातील तीन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आत्महत्येप्रकरणी दोंडाईचा पोलिस स्टेशनमध्ये रजि. 61/2021 प्रमाणे भादवी कलम 306, 506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील चार आरोपींपैकी एक आरोपी बंन्सीलाल दलपतसिंग गिरासे यांना धुळे जिल्हा न्यायालयाने यापुर्वी अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला होता. उर्वरित तीन आरोपींनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता त्यात उच्च न्यायालयाने तिघे आरोपी डाॅ. नरेंद्र गिरासे, अनिता गिरासे, सागर गिरासे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला यापूर्वी त्याना अंतरीम जामीन मिळाला होता याबाबत सविस्तर माहिती अशी की टाकरखेडा येथील माजी उपसरपंच धिरेंद्र सिसोदिया यानी गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्या प्रमाणे दोंडाईचा पोलीस स्टेशनला पंचनामा होवून आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला परंतु 48 तासानंतर मयतचे बंधू शैलेंद्र सिसोदिया यांच्या फिर्यादी नुसार आत्महत्येस कारणीभूत म्हणून आरटीआय कार्यकर्ते अनिता गिरासे यांच्यासह त्यांचे पती डाॅ. नरेंद्र गिरासे, जेठ बन्सीलाल गिरासे, पुतण्या सागर गिरासे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या प्रकरणी अखेरअटकपूर्व जामीन मंजूर झाला. आरोपींच्या वतीने न्यायालयात अॅड. हर्षद निंबाळकर व अॅड. कराड यांनी युक्तिवाद केला होता.