पेस्टीसाईड च्या किमतीवर शासनाचा अंकुश हवा


 



पेस्टीसाईड च्या किमतीवर शासनाचा अंकुश हवा

गणपूर(ता चोपडा)ता ०१:

पिकांच्या फवारणी साठी वापरण्यात येणाऱ्या औषधींवर असलेल्या किमती अव्वा च्या सव्वा असतात आणि त्यापेक्षा कमी किमतीने ही औषधी मिळत असली तरी त्यात एकसूत्रीपणा नसल्यामुळे या किमतींवर शासनाने अंकुश घालावा अशी मागणी गलवाडे(ता चोपडा)येथील प्रयोगशील शेतकरी प्रदिप देसले यांनी केली आहे.        प्रत्येक वर्षी किड  मोठ्या  प्रमाणात प्रत्येक पिकावर आक्रमण करते त्यावेळी पेस्टीसाईड घेण्यासाठी कृषी केंद्रावर जावे लागते. तेव्हा असे लक्षात येते की एखादे प्रॉडक्ट्स तुम्ही घेतले तर त्यावर किंमत असते 

1500 रुपये लिटर ,आणि कृषी केंद्र चालक आपल्याला बिल 1100 रुपये लिटरचे देतो त्यामुळे आपण काहीच बोलू शकत नाही .परंतु तीच औषधी दुसरीकडे एक हजार रुपये प्रति लिटरच्या भावाने सुद्धा मिळते .प्रत्येक विक्रेता नफ्याशिवाय व्यवसाय करत नाही मात्र भावातील ताफवातीत  शेतकऱ्याची लुबाडणूक होत असून फवारणीच्याऔषधांच्या एम आर पी (मॅक्झिमम् रिटेल प्राईस)ह्या कमीतकमी नफा आकारून विक्री करण्याच्या धोरणाची शासन स्तरावर अंमलबजावणी होण्याची गरज असल्याचे मत देसले यांनी व्यक्त केले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने