: *चोरींच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील दोंडायचा येथील पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारींनी धरला पायी ग्रस्तीचा ठेका....**चार तास विविध रहिवासी वस्तींमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन केले प्रबोधनपर मार्गदर्शन....*प्रत्यक्ष पोलीस अधिकारी माझ्या दारी-ह्या उपक्रमाने नागरिक सुखावले....*

 :



 *चोरींच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील दोंडायचा येथील पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारींनी धरला पायी ग्रस्तीचा ठेका....**चार तास विविध रहिवासी वस्तींमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन केले प्रबोधनपर मार्गदर्शन....*प्रत्यक्ष पोलीस अधिकारी माझ्या दारी-ह्या उपक्रमाने नागरिक सुखावले....*


*शिंदखेडा दि.०१(तालुका प्रतिनिधी ( यादवराव सावंत )-*


*शिंदखेडा-*  तालुक्यातील दोंडायचा  शहरातील उच्च शिक्षीत रहिवासी भागात दिवसाढवळ्या होणाऱ्या चोरांच्या पाश्वभुमीवर आज स्वतः दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांनी विविध रहिवासी काँलन्यांमध्ये प्रत्यक्ष पायी ग्रस्त घालत, घरोघरी भेट देत धस्तावलेल्या नागरिकांना आपल्या घराची,शेजारील घराची, संपुर्ण काँलनीची चोरी होणाच्या घटनेपासुन कशी काळजी घेता येईल. याबाबत मार्गदर्शन केले. म्हणून घाबरलेल्या नागरिकांमध्ये एक प्रकारे उर्जा मिळाली असुन, प्रथमच अशा पद्धतीने पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या प्रबोधनपर मार्गदर्शनाने नागरिक सुखावले आहे व त्यांच्या  "प्रत्यक्ष पोलीस अधिकारी घरी" ह्या उपक्रमाचे गावातुन कौतुक केले जात आहे.


सध्या सर्वचकडे नागरिक करोना सारख्या महामारीतून बाहेर निघत असताना,म्युकरमायकोसेस व डेल्टा पल्सचे संकट डोक्यावर आहे.एकीकडे पाऊसाळा जरी म्हटला तरी वरूण राजाने चांगलीच पाठ फिरवली आहे. त्यातच अल्पकाळासाठी लाँकडाऊन असल्यामुळे अनेक लोकांचे व्यापार-व्यवसाय, नोकरी,कामधंदा,शेतीसाठी साहित्य व लागणारा पैसा, हातमजुरी पुर्वपदावर आलेली नाही आहे. म्हणून अनेकांच्या हाताला पाहिजे तेवढे काम मिळत नाही आहे. कुटुंब व्यवस्था चालवणे पार विस्कळीत होऊन चालले आहे. अशात चोऱ्यांचे प्रमाण गावात वाढले आहे. मागील काही दिवसांपासुन शहरातील उच्च शिक्षीत रहिवासी काँलन्यांमध्ये दिवसाढवळ्या चोरींच्या घटनांना चोरांकडून लक्ष केले जात आहे. आधीच पोलीस विभाग सरकारने करोना, डेल्टा पल्स पाश्वभुमीवर वेळोवेळी घालून दिलेले नियम नागरिकांकडून राबवून घेण्यात दिवसरात्र मेहनत घेत आहे. त्यात कमी वेळात पैसा कमविणे अशी विकुत मानसिकता व हाताला काम नसल्यामुळे काही जण तर काही अल्पवयीन मुले चोरी करणाच्या मार्गाकडे वळले आहे. म्हणून दोंडाईचा शहरात मागील काही दिवसांपासून दिवसाढवळ्या चोरीच्या घटनात वाढ झाली आहे.त्यात शिक्षक, नोकरदार वर्ग व बाहेरगावी गेलेले बंद घर चोरांकडून चोरीसाठी लक्ष केले जात होते. म्हणून नागरिक घाबरलेल्या अवस्थेत कितीही महत्त्वाचे काम असले तरी घरी कोणीतरी एकाने घरी थांबायचे ह्या भावनेतुन जीवनमान जगत आहेत.


यासर्व परिस्थितीचा अभ्यास करत आज दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांनी घाबरलेल्या नागरिकांना धीर देण्यासाठी व त्यांच्या मनातील भिती घालवण्यासाठी त्यांनी अचानक  " पोलीस अधिकारी माझ्या दारी" ह्या उपक्रमाची सुरूवात वुदांवन काँलनी, विद्या काँलनी,गबाजी नगर, प्रोफेसर काँलनी, सरस्वती काँलनी, मालू नगर, हुडको काँलनी, हरचंद नगर,कोठारी पार्के,डी.जे.नगर,पटेल काँलनी,चुडाणे रस्ता, रश्मी नगर आदी भागात तीन ते चार तास पायी ग्रस्त घालत,प्रत्येक घरी भेट देत. नागरिकांचे प्रबोधनपर मार्गदर्शन केले. त्यात प्रत्येक काँलनी परिसरात ज्येष्ठ, तरूण, समाजसेवक पोलीस मित्र तयार करत,काँलनीत येणाऱ्या प्रत्येक नवीन चेहऱ्यावर लक्ष ठेवत,त्याची विचारपूस करणे. दारापर्यंत आलेल्या फेरीवाल्यांची माहिती ठेवणे.अनोळखी व्यक्ती व संशयीत व्यक्तीची पोलीसांना माहिती देणे, घरात जास्तीचे रोख पैसे व दागदागिने ठेवण्यापेक्षा बँक व बँकेचा सुरक्षित लाँकरचा वापर करणे, घराचे गेट,दरवाजा, महत्त्वाचा कपाटांना सुरक्षित कुलूप लावून दैनंदिन तपासणी करणे,बाहेरगावी जाताना शेजारील व्यक्तींना कल्पना देणे, घराबाहेर व घराबाहेरील दुकानांपुढे सीसीटीव्ही लावणे शक्य असल्यास,  नसल्यास पांढरा लाईट लावणे, तसेच मनातील भिती काढून चोर व चोरा सदुश्य व्यक्ती दिसल्यास, सुगावा लागल्यास पोलिसांनी तात्काळ माहिती देणे आदी मार्गदर्शन केले. 


यावेळी विविध रहिवासी काँलनीत दिवसा काढलेल्या पोलीस ग्रस्तीत पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी, पोलीस उपनिरीक्षक श्री देवीदास पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री सचीन गायकवाड, पोलीस नाईक राकेश खांडेकर, योगेश पाटील, मुकेश आहिरे, संदीप कदम,मोहन पाटील, राजेंद्र सोनवणे, राकेश पावरा आदी उपस्थित होते.


तसेच पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांच्याकडून अचानक राबविलेल्या पोलीस निरीक्षक आपल्या दारी उपक्रमाबाबत जाणून घेतले असता त्यांनी सांगितले की, पोलीस हे जनतेच्या जान- माल सुरक्षिततेसाठी काम करत असतात. सध्या मागील आठवड्यात काही ठिकाणी चोरींच्या घटना झाल्या होत्या. त्याबाबत पोलीस तपास सुरू आहे. मात्र जनतेच्या मनात जी भिती निर्माण झाली आहे. ती काढणेही तेवढेच गरजेचे आहे. म्हणून आज आम्ही विविध काँलनी एरियामध्ये प्रत्यक्ष घरी भेट देत. लोकांच्या मनातील भिती दुर करत,त्यांना धीर देत.भविष्यात कशी काळजी घेता येईल व रहिवासी एरियात संशयित दिसल्यास पोलीसांशी तात्काळ संपर्क करण्यासाठी आम्ही आमचे भ्रमणध्वनी नंबर दिले आहेत.शेवटी पोलीस हे जनतेच्या सुरक्षितेसाठी काम करत असतात हे,ही आवर्जून त्यांनी सांगितले.

[8/1, 10:56 AM] Zatpat Shidakheda yadavRao Savant: *काँग्रेस पक्षाच्या व्यर्थ न हो बलिदान अभियानात* *जिल्हय़ातील पदाधिकारी सह कार्यकर्ते यांनी* 

 *हजारोच्या संख्येने* *सहभागी व्हा -आमदार* *कुणाल पाटील*                         शिंदखेडा तालुका प्रतिनिधी ( यादवराव सावंत)

शिंदखेडा- देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कॉग्रेसच्या नेत्यांनी प्राणाची आहूती दिली आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशात स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाला उजाळा मिळावा म्हणून काँग्रेसच्या व्यर्थ न हो बलिदान या अभियानात जिल्हयातील जनतेने हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांनी केले.

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्यावतीने दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी भारतीय स्वातंत्र्याला 74 वर्ष पूर्ण होवून 75 वर्षात आपण पदार्पण करीत आहोत. स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी आज दि.1 ऑगस्ट 2021 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत व्यर्थ न हो बलिदान हे अभियान राबविले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आज दि. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2021 दरम्यान विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. त्याअनुषंगाने धुळे जिल्हयात हे अभियान राबविण्यात येणार असून त्या पार्श्‍वभूमीवर आज दि.31 जुलै रोजी आ.कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत पूर्वतयारीसाठी बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि,भारतीय स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसच्या नेत्यांनी बलिदान देत स्वातंत्र्य मिळविले. या लढ्यात अनेकांना आपल्या प्राणाची बाजी लावावी लागली.मात्र आज भाजपासारखा पक्ष भारतीय स्वातंत्र्याचा प्रेरणादायी लढा पुसण्याचे काम करीत असून हुकूमशाहीकडे देश नेण्याचे काम केले जात आहे. स्वातंत्र्याचा इतिहास पुसून भाजपा तरुणांमधील देशप्रेम कमी करीत आहे. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीचा खरा इतिहास लोकांसमोर यावा म्हणून काँग्रेस राबवित असलेल्या व्यर्थ न हो बलिदान या अभियानात हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आ.पाटील यांनी केले. यावेळी माजी मंत्री हेमंतराव देशमुख यांनी मार्गदर्शन करतांना भाजपावर टीकास्त्र सोडीत देशातील कोणत्याही भाजपा नेत्यांचे स्वातंत्र्य कोणतेही योगदान नाही. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी फितूराची भूमिका वठविली आहे. त्यामुळे कष्टाने मिळविलेले स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात आले असून भाजपा आणि नरेंद्र मोदी देशाला पारतंत्र्यात ढकलण्याचे काम करीत आहेत.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर प्रास्ताविकपर भाषणात म्हणाले कि, भाजपामुळे देशात जातीयवादी शक्ती डोके वर काढत आहेत.सर्वधर्म समभाव असलेल्या भारतात समाजासमाजात भांडणे लावून देशातील तरुणांची डोके भडकविण्याचे काम भाजपा करीत आहे.स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणींना उजाळा देत देशात एकता नांदावी आणि काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान आजच्या तरुण पिढीसमोर यावे म्हणून काँग्रेस पक्ष व्यर्थन हो बलिदान हे अभियान राबवित आहे.धुळे जिल्हयातील चिमठाणा क्रांतीस्मारक येथे होणार्‍या या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आदिवासी मंत्री के.सी.पाडवी, वैद्यकिय शिक्षण मंत्री ना.अमित देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.अभियानाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकिला माजी मंत्री हेमंतराव देशमुख, काँग्रेस कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील, माजी खासदार बापू चौरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, काँग्रेस शहराध्यक्ष युवराज करनकाळ, माजी आ.प्रा.शरद पाटील, ज्येष्ठ नेते साबीर शेठ, उत्तमराव देसले,व्ही.यू.पाटील, रमेश श्रीखंडे, गुलाबराव कोतेकर, बाजीराव पाटील,साहेबराव खैरनार, रावसाहेब पवार, प्रकाश पाटील, उत्तमराव माळी, कृऊबा प्रशासक रितेश पाटील, धुळे तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष डॉ.दत्ता परदेशी, दिलीप शिंदे, एन.डी. पाटील, साक्री काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, अविनाश महाजन,माधव बडगुजर,दिपक देसले,दिनेश महाले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, माजी अध्यक्ष हर्षल साळुंके, राहूल माणिक,प्रविण पवार,धिरज अहिरे, विश्‍वास बागुल,राजेंद्र देवरे, हेमराज पाटील,बापू खैरनार,किशोर बागल,अविनाश शिंदे यांच्यासह धुळे,शिरपुर,शिंदखेडा,साक्री आणि धुळे शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.

        

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने