सोनगीर - वाघाडी फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत ट्रॅक्टर पलटी ३ मजुर जखमी




सोनगीर - वाघाडी फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत ट्रॅक्टरपलटी ३ मजुर जखमी

 वालखेड़ा दि.०१ (प्रतिनिधी: संदीप येळवे )सोनगीर येथील वाघाडी फाट्यावर आज संध्याकाळी ट्रॅक्टर - क्रमांक एम एच 18AN 2791ट्रॉलीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टर ट्रॉलीत बसलेले तीन मजूर जबर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. 

आज संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर नरडाणा कडून सोनगीर कडे येणाऱ्या  ट्रॅक्टरला मागून येणाऱ्या  अज्ञात वाहनाने  धडक दिली. यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उलटले. हा अपघात येथील अपघातासाठी कुप्रसिद्ध असलेल्या वाघाडी फाट्यावर झाला. सदर ट्रॅक्टर धुळे भोपाल ट्रान्समिशन कंपनीच्या टॉवर उभारणी करणाऱ्या मजुरांना व बांधकाम साहित्य वाहून नेण्याच्या कामासाठी वापरण्यात येते. यावेळी ट्रॅक्टर मध्ये मजूर बसलेले होते. अज्ञात वाहनाने मागवून धडक दिल्याने ट्रॉली तील मजूर बाहेर फेकले जाऊन जबर जखमी झाले. त्यांना सोनगीर टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेच्या सहाय्याने धुळे जिल्हा रुग्णालयात  उपचारासाठी पाठवण्यात आले. यापैकी दोन मजुरांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. धडक देणारे वाहन पसार झाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने