*हेमंत सोनवणे हे इंडियन आर्मी मधून 17 वर्ष देश सेवा बजावून सेवानिवृति झाले*

 *





 सोनवणे हे इंडियन आर्मी मधून 17 वर्ष देश सेवा बजावून  सेवानिवृति झाले*


वालखेड़ा दि.०४ (प्रतिनिधी:संदीप येळवे)


सविस्तर वृत्त असे की,वालखेड़ा येथील इंडियन आर्मी चे श्री हेमंत रमेश सोनवणे आज इंडियन आर्मी मध्ये 17 वर्ष देश सेवा बजावून सेवानिवृत झाले सेवानिवृत्तिच्या वेळीही ते लड़ाख समुद्रसपाटी पासून 19000फुट ऊंच अशा ठिकाणी देश सेवा बजावत होते.

  2004 या वर्षी अहमदनगर या ठिकाणी ते इंडियन आर्मी मधे भर्ती झाले होते . अहमदनगर ला 18 महिन्यांची ट्रेंनिग पूर्ण करून पहिली पोस्टिंग सुरतगड राजस्थान या ठिकाणी 3 वर्ष,त्यानंतर 55 राष्ट्रीय रायफल पुलवामा डिस्ट्रिक्ट कश्मीर येथे अडीच वर्ष ,ग्वालियर नंतर तीन वर्ष जम्मू शहरात देशसेवा दिली.

3 वर्ष वेअपॉन्स ट्रेनिंग इंस्ट्रक्टर म्हणून अहमदनगर येथे कार्यरत त्यानंतर अमृतसर येथे 2 वर्ष सेवा दिली. सेवानिवृतिच्या शेवटचे 1 वर्ष अतिशय खड़तर अश्या लड़ाख समुद्र सपाटी पासून 19000 फुट ऊंच ,तापमान 40 डिग्री ऑक्सीजन लेवल 60% अश्या निर्मनुष्य रक्त गोठवणाऱ्या हिमालयात देशसेवा बजावून आज दिनांक 02/08/2021 रोजी  सुखरूप सेवानिवृत्त झाले.

 शाळेत हुशार आणि तेवढांच खोड़कर असलेल्या हेमंत ने अतिशय कष्ट आणि कठोर मेहनत घेऊन इंडियन आर्मी मधे नोकरी मिळवून आपले आयुष्य सुंदर फुलवले, सेवानिवृति नंतर चे आयुष्य हेमंत सोनवणे याचे अतिशय सुखी समाधानाचे जावो हीच आई भवानी माते कड़े सर्व मित्रां कडून  प्रार्थना पुढील आयुष्य  हेमंत सोनवणे चे आरोग्यमय ,निरोगी जाओ आणि आपल्या हातून सत्कर्म घडो

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने