मार्कंडेय पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज बरडगाव चा 100 %निकाल....
यवतमाळ,दि.०५( जिल्हा अध्यक्ष शेख राजिक )
ईश्वर शिक्षण प्रसारकफल मंडळ राळेगाव द्वारा संचालित मार्कंडेय पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज चा नुकताच सी. बि. एस. इ. व स्टेट बोर्ड 12 वि. Science शाखेचा निकाल जाहीर झाला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुद्धा यशाची परंपरा कायम राखत याही वर्षी शाळेचा व ज्युनिअर कॉलेज चा 100 %निकाल लागला असून विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाचे सर्वत्र अभिनंदनपर कौतुक केले जात आहे. विद्यार्थ्यांपैकी सि. बि. एस. सि. 10 वि. च्या कु. सायली कोहले 98.2 %तर कु. अवंतिका गवळी 98%, समर्थ काळे 96%,सुबोध ओंकार 96%तर रिद्धी आत्राम 93%मिळवून यशाची परंपरा कायम ठेवली तर 12 वि. स्टेट बोर्ड च्या science शाखेतून कु. वैष्णवी सांगेवार 95%,कु. दिया रायमल 93%तर साक्षी गलांडे 92 %मिळवून यशस्वी झाले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत असून संस्थेचे अध्यक्ष डॉ श्री. संतोष कोकुलवार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच शाळेच्या संचालिका डॉ. शीतल बलेवार यांनी सुद्धा यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याच प्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक श्री. सतीश काकडे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच शाळेच्या सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...