पतिचा अपघात झाल्याचे सांगत.. जंगलात नेऊन महिलेवर बलात्कार.. शेजारचे दोघे पोलिस हतकडीत..
नवी दिल्ली ,दि २९ : पतीचा अपघात झाल्याचे खोटे सांगत महिलेला जंगलात नेवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना मध्य प्रदेशातील ग्वालियर जिल्ह्यात घडली. अत्याचारानंतर संशयीत महिलेला सातत्याने ब्लॅकमेल करीत असल्याने पीडीतेने पोलिसात या प्रकरणी तक्रार दिल्यावरून अरविंद माहौर आणि सोनू माहौर यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीतेचा पती ऑटो चालक असून संशयीत घराशेजारीच राहतात. पीडीतेचा पतीचा अपघात झाल्याचे खोटे सांगून आरोपींनी अत्याचार केला व घटनेची वाच्यता केल्यास पतीसह मुलांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी ही घटना घडल्यानंतर आरोपी ब्लॅकमेल करीत असल्याने पीडीतेने हिंमत करून तक्रार नोंदवली. महाराजपुरा पोलीस ाण्याचे सीएसपी रवि सिंह भदौरीया म्हणाले की, महिलेच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपीं विरोधात अपहरण आणि गँगरेपचा गुन्हा दाखल असून पसार आरोपींना आम्ही लवकरच अटक करू.