बापरे..बाप..! आठ लाखांचा मुद्देमाल चोरी.. हळदीच्या कार्यक्रमाला जाणे कुटुंबीयांना पडले महाग.. चोरट्यांनी बंद घर बघून साधला डाव..


 


बापरे..बाप..! आठ लाखांचा मुद्देमाल चोरी.. हळदीच्या कार्यक्रमाला जाणे कुटुंबीयांना पडले महाग.. चोरट्यांनी बंद घर बघून साधला डाव..


अमळनेर दि.२९(प्रतिनिधी): घर बंद असल्याची चोरट्यांनी संधी साधत तब्बल रोख रखमेसह आठ लाखांचे दागिने लांबवल्याची घटना ताडेपुर्‍यात घडल्याने खळबळ उडाली आहे. 28 रोजी रात्री 9 ते 12 वाजेदरम्यान ही चोरी झाली.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा

रेखा अनिल लांडगे ही महिला 28 रोजी रात्री कुटुंबातील सदस्यांसह बहादरपूर रोडवरील खळेश्वर कंजरवाड्यात हळदीच्या कार्यक्रमाला गेल्याने चोरट्यांनी बंद घराला टार्गेट करीत कपाटातील दोन लाख 40 हजार रुपये किंमतीचे सहा तोळ्यांचे तीन सोन्याचे नेकलेस, एक लाख 20 हजार रुपये किंमतीचे तीन तोळ्यांचे तीन सोन्याचे काप, 24 हजार रुपये किंमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल, 80 हजार रुपये किंमतीच्या 20 ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्या, आठ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे कानातले किल्लू व बाळ्या, 40 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र, 20 हजार रुपये किमतीचे पेंडल व मणी, 7 हजार 500 रुपये वजनाचे 15 भार वजनाचे चांदीचे पैंजण, 5 हजार रुपयांचा 10 भार चांदीचा कंबरेचा पट्टा व कपाटातील 2 लाख 50 हजार रुपये रोख असा एकूण 7 लाख 94 हजार 500 रुपयांचा माल लांबवला. घटनास्थळी डीवाय.एस.पी. राकेश जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहा.पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, दीपक माळी, रवी पाटील यांनी भेट दिली. महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने