तोंडापुर येथे जुगार अड्ड्रंयावर धाड..रंगात आलेला जुगाराचा डाव उधळला ः 12 संशयीत ताब्यात.. ग्रामपंचायत कार्यालय मागेच चालू होता खेळ
जामनेर ,दि.२९(प्रतिनिधी): तालुक्यातील तोंडापूर येथे जुगार्याच्या अड्ड्याबाबत तक्रारी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी रंगात आलेला डाव उधळत 12 संशयीतांना ताब्यात घेतले. ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे जुगार खेळला जात असताना पोलिसांनी कारवाई करीत जुगार अड्डयाचा मालक करीम अब्दूल कुरेशी, युवराज श्रावण पाटील, शेख इम्रान युनूस शेख तसेच शेख हसन शेख सांडू, अरूण दामू जिरी, इब्राहिम तडवी यांच्यासह एकूण 12 संशयितांना ताब्यात घेतले. संशयीताकडून जुगाराचे साहित्य, रोख रकमेसह पाच हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हवालदार भरत लिंगायत, कॉन्स्टेबल रवींद्र देशमुख, ज्ञानेश्वर बाविस्कर यांच्या पथकाने ही कारवाई केली.