शिंदखेडा नगरपंचायतीच्या शहरात अनियमित पाणीपुरवठा विरोधी महाविकास आघाडी,वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हंडा मोर्चा*





 *शिंदखेडा नगरपंचायतीच्या शहरात अनियमित पाणीपुरवठा विरोधी महाविकास आघाडी,वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हंडा मोर्चा*                                

  शिंदखेडा दि.२९ (यादवराव सावंत तालुका प्रतिनिधी) _येधील नगरपंचायत च्या वतीने शहरात पाणीपुरवठा होत असताना गेल्या काही दिवसांपासुन बारा ते दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे म्हणुन शहरवासीयांना पिण्याचे पाण्याचा प्रचंड हाल होत आहेत ह्यासंदर्भात आज महाविकास व वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने हंडा मोर्चा नगरपंचायतीवर नेण्यात आला त्या आशयाचे निवेदन मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांना देण्यात आले,               सुरुवातीला शहरातील शिवाजी चौफुलीपासुन थेट नगरपंचायत कार्यालयावर महाविकास आघाडीचे काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना व वंचित बहुजन आघाडी तर एम आय एम च्या पदाधिकारी व शहरातील नागरीक हंडा मोर्चा त मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते, सत्त्ताधारी व मुख्याधिकारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शहर दणानुन सोडले,यानंतर मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे शहरातील अनियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे हयावेळी जाब विचारत सत्ताधारीसह मुख्याधिकारी यांना विरोधी पक्षाचे पदाधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले,त्यानंतर पाणीपुरवठा का अनियमित आहे , केटी वेअर ला पावसाळा सुरु होण्याआधी पाणी संकलीत करणे असतांना का केले नाही, शहरातील सर्वच वार्डात पाण्याचा पुरवठा बारा ते पंधरा दिवसाआड होत आहे,पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यांत आला,  यावर खुलासा मुख्याधिकारी यांनी तापी नदीला हातनुर धरणाचे पाणी सोडल्याने अडचण निर्माण झाली होती मात्र हयापुढे तसे होणार नाही असे आश्वासन दिले हयावेळी काँग्रेसचे गटनेते दिपक देसले,विरोधीपक्षनेते सुनिल चौधरी,नगरसेवक दिपक अहिरे,उदय देसले,संगिताबाई चंद्रकात सोनवणे,संगिता किरण थोरात,दिनेश माळी,सुमित जैन,समद शेख,कैलास वाघ,गजु भामरे,राजु थोरात,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रविण पाटील,युवक शहराध्यक्ष गोलु देसले,उपाध्यक्ष मिलींद देसले,चेतन देसले,इरफान शेख,रहीम खाटीक,दर्पण पवार,चेतन बडगुजर,उदय गुरव,शिवसेना चे विधानसभा संघटक गणेश परदेशी,शहराध्यक्ष संतोष देसले,समन्वयक विनायक पवार,वंचीत बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष राहुल पाटोळे,एम आय एमचे विक्की खाटीक यासह शहरातील नागरीक मोठय़ा संख्येने उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने