आदिवासी जमातीला मारहाण.. ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी*



 *राळेगाव दि. 1 (तालुका प्रतिनिधीअमित ढोबळे)*:* यवतमाळ जिल्ह्यामधील झरी या तालुक्यातील वरपोड येथील आदिवासी जमातीच्या महिलांना अमानुष मारहाण करण्यात आली. या प्रकरणाची वन संरक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबनाची अनुसूचित जाती व जमातीच्या त्‍याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली आहे. .पांढरकवडा व संरक्षण विभागाचे अधिकारी यांच्या वतीने वाघाची शिकार प्रकरणात गाव वरपोड तालुका झरी जामणी जिल्हा यवतमाळ येथील आदिवासी कोलाम जमातीच्या वस्तीवर तीनशे वनसंरक्षण अधिकार अधिकारी व कर्मचारी आणि शंभर पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने संशयित पुरुषांना पकडण्याच्या उद्देशाने कारवाई करण्यात आली. परंतु या कार्यवाहीत वरपोड गावातील एकूण आदिवासी कोलाम महिलांना विनाकारण अमानुष मारहाण करण्यात आली .गर्भवती महिला व एक अल्पवयीन मुलगी होती .त्यांना सुद्धा व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अधिकार्‍यांनी यांनी बेदम मारहाण केली .अनुसूचित क्षेत्रात दहशत निर्माण करण्याचे काम केले आहे. आदिवासी कोलाम समाजात वाघाला कुलदैवत वाघोबा या नावाने संबोधले जाते त्यांनी पारंपरिक पध्दती नुसार पूजा केली जाते .वाघाला मारल्या जात नाही .तसे असते तर टिपेश्वर अभयारण्यातील एकही वाघ शिल्लक राहिला नसता. विनाकारण आदिवासी कोलाम समाजातील महिलांना मारहाण करण्यात आली. वन संरक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबनाची अनुसूचित जाती व जमाती अत्याचार कायद्या अंतर्गत ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत दाखल करावी. अशी मागणी कळंब

तालुक्यातील कोलाम समाज यांच्या वतीने कळंब तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आली.या वेळी निवेदन देताना. अंकुश रामरतन कासारकर, राहुल माधवराव चीचघाटे , संजय सुरेश घोटेकर, मंगेश कुंभेकर , अनिल बाळापुरे , रवींद्र टेकाम नामदेवराव टेकाम ( मा.सरपंच कळंब ( विशाल सुटकर आदी कोलाम समाज उपस्थित होते..

(राळेगाव तालुका प्रतिनिधी) अमित ढोबळे ( झटपट पोलखोल न्यूज )

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने