वर्डी गावातील अवैध धंद्यांना राजकीय उकळी.. इकडे उपोषण.. तिकडे सभा..हा गोंधळ* *झालाच कसा..माय -बाप गावकऱ्यांनो थोडा तरी विचार करीत बसा..!**

 





*वर्डी गावातील अवैध धंद्यांना राजकीय उकळी.. इकडे उपोषण.. तिकडे सभा..हा गोंधळ* *झालाच कसा..माय -बाप गावकऱ्यांनो थोडा तरी विचार करीत बसा..!** 

चोपडा दि.२७(प्रतिनिधी) तालुक्यातील वर्डी गावातील अवैध धंद्यांचा बिमोड करण्यात यावा यासाठी माजी जि.प.सदस्य बसले उपोषणाला..तर दुसरीकडे पोलीसांनी घेतली गावकऱ्यांची महाकाय सभा.. पोलिसांकडून उपोषणकर्ते व गावकऱ्यांना अवैध बंद करण्याचे आश्वासन मिळाले आहे.एकंदरीत ह्या घडामोडी सामान्य नागरिकांचे डोके गरगर फिरविणाऱ्या जरी असल्या तरी आत्म संशोधन करायला लावणाऱ्या आहेत."गाव करील तिथं राव काय करील "असं म्हटलं जातं खरी ..पण हे बोलण्या पुरतं आहे की काय ?असा  प्रश्न लोकांमध्ये निर्माण होतो आहे .सट्टा, जुगार व दारू अड्डे हे गावातील काहींचे आणि पिणारे,खेळणारे हेही गावातलेच आणि नुकसानाची झळही पोहचते ती बिचाऱ्या गावकऱ्यांनाच..मग अशा प्रकारांना उकळी फुटतेच कसं काय?हे न उलगडणारे कोडे सोडवायचे कसे .? तसेच हे असले अनधिकृत उद्योग मिटवायची  जबाबदारी पोलिसांची, गावकऱ्यांची, पुढाऱ्यांची का सामाजिक संस्थांची  असे सामाजिक चिंतन करायला लावणारा प्रश्र्न जनतेचे डोके खाजवायला लावणारा आहे.. एवढे मात्र खरे..!

*अवैध धंद्यांचा बिमोड करूच.. तक्रारीसाठी गावकऱ्यांनी पुढे यावे - पोउनि किरण दांडगे* 

 दारू असो वा मटका.. जुगारी असो वा तळीराम यांच्यावर सापडले की पोलिसांचा दंडा चालतोच हे जनतेलाही माहीत आहे.पण त्यासाठी तक्रारदारांची फौज पुढे आली पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे.आमची कारवाई विना तक्रारीनेही जोरदार पुणे सुरूच राहते ती खंडीत न होणारी प्रक्रीया आहे .आज मी असेल उद्या दुसरा पोलिस अधिकारी असेल एवढाच फरक असतो.अवैध धंद्यांना ऊत आणणारे जनतेतील काही जण असतात त्यांच्या नांग्या ठेचायला आम्ही अर्ध्या रात्रीही तयारच असतो त्यासाठी जनतेनेही पुढे आलं पाहिजे महिला वर्गाने आपल्या कुटुंबातील जरी कोणी गैर काम करत असेल त्याविरुद्ध तक्रार द्या आम्ही कारवाई करण्यास बांधील आहोत असे आश्वासन अडावद पोलिस स्टेशनचे एपीआय किरण दांडगे यांनी वर्डी येथील प्रचंड संख्येने उपस्थित गावकऱ्यांना दिले ..आता गावातील अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी खास गुप्त पद्धतीने धाडी टाकण्याचे सत्र सुरू करू गावकऱ्यांनी पोलीसांचे सोबतीला उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी सरपंच बबिताई धनगर, पोलिस पाटील पद्माकर नाथ, उपसरपंच पांडुरंग कोळी,ग्रा.पं.सदस्य भागवत कोळी, गुलाबराव ठाकरे,माजी उपसरपंच दीपक चंपालाल पाटील,कविश्वर पाटील,महारू सुलताने, उमाकांत पाटील,मनोज चव्हाणसर,दीलीप पाटील, सुरेश शालिग्राम पाटील या प्रतिष्टीत व्यक्तिंसह, महिला, तरूण व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

*माजी जि.प.सदस्य विजय पाटलांचे लाक्षणिक उपोषण** 

चोपडा तालुक्यातसर्वत्र सुरू असलेले अवैध धंदे पोलीस प्रशासनाने तात्काळ बंद करा तसेच रेशनचा काळा बाजार थांबवा या मागणीसाठी वर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य व चोसाकाचे संचालक विजय दत्तात्रय पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह दि. २६ जुलै रोजी सोमवारी सकाळी १० वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तहसील कार्यालयावर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी अनेकांनी हजेरी लावून लाक्षणिक उपोषणाला पाठींबा दर्शविला. तर तहसीलदार अनिल गावित,ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराक यांनी आज दुपारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा करून अवैध बंद करणे संदर्भात प्रशासना तर्फे आश्वासन दिले.

 यावेळी पंचायत समितीचे माजी सभापतीगोपाळराव सोनवणे,चोसाका चेअरमन अतुल ठाकरे,व्हॉ.चेअरमन शशिकांत देवरे,संचालक प्रवीण गुजराथी,निलेश पाटील,बाजार समितीचे माजी सभापती नारायण पाटील,राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनिल साठे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज पाटील यांचेसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालया वरील राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील यांच्या लाक्षणिक उपोषणाला भेट देऊन पाठींबा दिला.यावेळी वर्डी येथील सचिन ढाबे यांचेसह कार्यकर्ते,ग्रामस्थ व महिला देखील उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने