*सावरखेड दि.1(तालुका प्रतिनिधी अमित ढोबळे)* :
दि.1 जुलै रोजी विहिरगाव गावा लगत रोपवन 2020-21 चे आयोजन पांढरकवडा वन विभागा मार्फत करण्यात आले होते,सर्व प्रथम पांढरकवडा वन विभागाचे डी एफ ओ जगताप सर यांनी फलक अनावरण केले त्या नंतर वन विभाग अधिकारी वर्ग व परळी पॉवर ग्रीड यांचे अधिकारी यांनी वृक्षारोपण केले त्या नंतर शामा प्रसाद मुखर्जी जन वन समिती सावरखेड ,वरध,वेडशी या गावाच्या समिती अध्यक्ष, सचिव ,सदस्य यांना विविध फळ झाडांचे रोपे भेट स्वरूपात वाटप केली ,डी एफ ओ जगताप सर (पांढरकवडा वनविभाग )यांनी उपस्थित लोकांना वृक्ष लागवड या बाबत मार्ग दर्शन केले तसेच लोकांच्या समस्येचे निराकरण केले ,त्या नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर एफ ओ खाडे सर , सर्व कर्मचारी वर्ग मारेगाव वन परिक्षेत्र यांनी पुढाकार घेतला.