*अडावद ता चोपडा -( रियाज शेख)* :-
अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या माचला या गावा जवळील शेतात दि.१७ व २१ च्या रात्री झालेल्या चोरीच्या फक्त दोनच दिवसात सिंघम स्टाईलने तपासाचे सूत्रे फिरवून चोरांच्या मुसक्या आवळल्या यात सात आरोपींना अटक करण्यात आले असून .मुद्देमाल अस्तंगत करण्यात अजून यश आलेले नाही.मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पथक रवाना झाले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की प्रवीण देवराम निकम यांचा माचला गावा जवळच्या शेतात सिमेंट पाईप बनवण्याचा कारखाना होता परंतु तो कारखाना काही वर्षां पासून बंद अवस्थेत असल्याने चोरांनी त्याचा फायदा घेत चोरीला अंजाम दिला दि १७ रोजी ५ लाख ६८हजाराचा माल व दि२१रोजी १३लाख८५हजाराचा माल असा एकूण १९लाख ५३ हजार रुपये किमतीचे साहित्यांची चोरी केली होती या बाबत फिर्यादी प्रवीण देवराम निकम यांनी पोलीस ठाण्यात सिमेंट पाईप बनवण्यासाठी लागणाऱ्या लोखंडी साच्याची चोरीची फिर्याद दाखल केली होती भा.द.स१८६०,३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता .गुन्हा दाखल होताच पोलीस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किरण दांडगे यांनी सिंघम स्टाईल ने चक्रे फिरवली .या कामासाठी दोन पथके तयार करण्यात आली एक पथकात स्वतः सपोनि किरण दांडगे ,योगेश गोसावी, व दुसऱ्या पथकात पोउनि महेश घायतळ,कादिर शेख,पो कॉ अक्षय पाटील,गजानन आरेकर,होते या कार्यवाहीत यावल तालुका व जळगाव हे पिंजून काढत सिंघम स्टाईलने आरोपींच्या मुसक्या आवळल्या ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपिमधे विजय दिनकर तायडे रा यावल,शेख फारूक खाटीक,दिगंबर कोळी,अशपाक खाटीक ,रईस शेख कुर्बान,मुस्तफा अ कादिर, साजिद सबीर खान,या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली ही माहिती सपोनि किरण दांडगे यांनी सांगितली या चोरीच्या कामात वापरण्यात आलेली अशोक लेलाइंड कंपनी ची पांढऱ्या रंगाची माल वाहतूक ही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र चोरी झालेला मुद्देमाल आद्यपावेतो हस्तगत झालेले नाही.दि२९ रोजी त्या सात ही आरोपीना चोपडा न्यालायत हजर केले असता सात ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत जळगाव येते रवाना करण्यात आले आहे