*खेडीभोकरी परीसरात बिबट्याचा वावर*
*शेतकऱ्यांमधे भीतीचे वातावरण.. वन विभाग लक्ष घालणार काय?*
खेडीभोकरी, ता. चोपडा दि. 1 (महेश पाटील) तालुक्यातील खेडी भोकरी शिवारात बिबट्याचा वावर दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमधे मोठया प्रमाणावर भीतीचे वातवरण पसरले आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की भोकरी शिवारात गट न 14 रा.भोकरी निंबा डी पाटिल व.गट न.6 के.म.पाटील रा.भोकरी यांच्या शेतात 31 मे रोजी संध्याकाळी 4.30ते 5 वाजेचा सुमारास निंबा पाटिल हे शेतात गेले असता समोर अचानक बिबट्या दिसला व त्यानी भीतीने आरोडी मारली व त्या आरोडीने बिबट्या ने तेथून लगेच पलायन केले सदर बिबट्या बाजूचा शेतात शिरला हा सर्व प्रकार निंबा पाटिल यानी पाहीला व आजु बाजूच्या शेतकर्यानीही पायाचे ठसे पाहीले सदर प्रकार माहिती कथन केली तसेच बाजूस 20ते 30 एकर जमीन पडीत आहे त्यात त्यांचे वास्ताव्य असल्याचे बोलले जात आहे रात्री बिबट्या फिरण्याचे ठसे शेतकरयांना अनेक वेळा दिसले आहे. अनेक दीवसा पासुन परिसरात चर्चा पण होती.
रात्री पिकांना पाणी देण्यासाठी अक्षरशा शेतकरी जायला ताळत होते शेवटी बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी व मजुरांमधे भीतीचे वातवरण पसरलं आहे वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी परीसरातून व ग्रामथकडू होत आहे नाहितर पुढे होणाऱ्या परिणामास व नुकसानीस वन विभाग जबाबदार राहिल असे ग्रामथांमधून. बोलले जात आहे