चोपडयात विजांच्या कडकडळाट व ढगांच्या गडगडाटासह वरुण राज्याची दमदार हजेरी..तूर्तास अंगाची होणाऱ्या घामफुटीस विराम.. पेरणी योग्य पाउस नसल्याने शेतकरी अजूनही प्रतिश्रेत..!

  



चोपडा दि. 27 (प्रतिनिधी) : 7 जून उलटूनही चोपडा शहरात पावसाने दडी मारली होती. मात्र आज तिसऱ्या प्रहरी जवळपास 4:30 वाजता पावसाने विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह दमदार हजेरी लावल्याने चोपडेकरांना अनेक दिवसांपासून सतावत असलेल्या प्रचंड उकाडय़ापासून गारवा मिळाला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे हातगाडी वाल्यांची तारांबळ उडाली आहे

 विजांचा प्रचंड कडकडाट व ढगांचा गडगडाट होत असल्याने" गरजेला तो पडेल काय" या उक्तीला छेद पाडत पावसाने आगमन करत सर्वत्र पाणी च पाणी करून सोडले आहे. अर्धा तास चाललेल्या वरुण राजाच्या सरींनी गटारी भरून वाहू लागल्या आहेत तर बऱ्याच दिवसांपासून आंघोळ न करणाऱ्या रस्त्ये अक्षरशः चकाचक झाले आहेत तालुक्यातही बर्‍याच भागात पाऊल पडल्याचे चित्र होते. पेरणी योग्य पाऊस नसल्याचे बोलले जात आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने