अकोल्यातील सात वर्षाच्या चिमुकलीचा मंत्रमुग्ध स्वराविष्कार

 



अकोला (प्रतिनिधी)  जिल्ह्यामधील माउंट कॉर्मेल या शाळेत शिकणाऱ्या व मूळच्या विदर्भ कन्या असलेल्या कु. श्रुती रविप्रकाश भांडे या चिमुकलीने 'सा रे ग म पा- लिटिल चॅम्प्स' या झी टीव्ही वरील गायन स्पर्धेमध्ये वयाच्या ७ व्या वर्षी इतिहास घडवून संपूर्ण महाराष्ट्र व परीक्षक यांना मंत्रमुग्ध केले.   


 गायनाच्या स्पर्धेत, अतिशय प्रतिष्ठेचे व पारदर्शक व्यासपीठ असलेल्या 'सा रे ग म पा - लिटिल चॅम्प्स' या झी टीव्हीच्या या संगीत मंचावरील गायन स्पर्धेमध्ये मूळच्या विदर्भ कन्या असलेल्या कु. श्रुती रविप्रकाश भांडे या चिमुकलीने अतिशय भावनिक गायन करून संपूर्ण गायन क्षेत्रातील मंडळींना अचंबित केले आहे. प्रतिक्रिया देतांना 'फक्त निःशद्ब' असाच उच्चार प्रत्येक रसिक मनातून बाहेर पडला. 

  कु. श्रुतीचे वडील श्री. रविप्रकाश भांडे यांचे वडिलोपार्जित गाव म्हातोडी हे आहे. ते नोकरीनिमित्त अकोला येथील विद्या मंदिर हायस्कूल मध्ये शिक्षक आहेत. श्रुतीचे आजोबा श्री. भगवान भांडे हे सुद्धा सेवानिवृत्त हायस्कूल शिक्षक आहेत. भांडे घराण्यातील तिसऱ्या पिढीपर्यंत संगीताचा वारसा आहे. श्री. रवीप्रकाश भांडे हे देखील बालपणापासून अतिशय उत्कृष्ट तबला व हार्मोनियम वादक तसेच गायक सुद्धा आहेत. त्यांनी त्यांच्या लहानपणीच दूरदर्शन, आकाशवाणीवर अनेक कार्यक्रम सादर केलेले आहेत. मूळच्या विदर्भातील या भांडे कुटुंबामध्ये संगीताची मांडणी करण्याचा प्राथमिक स्वरूपाचा व्यासंग आहे. परंतु एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुरुवातीलाच सर्वोच्च असा सन्मान तिला लाभला. या स्पर्धेचे आदरणीय संगीततज्ञ व यापूर्वीचे लिटील चॅम्प यांनी तिला गौरविले. तिच्या माता-पित्याने केलेली मेहनत व तिची अपार जिद्द वाखाणण्याजोगी आहे. तसेच तिला दिलेले गाणेसुद्धा वास्तविक जीवनामधील मर्म सांगणारे होते. त्यामुळे 'सा रे ग म पा- लिटील चॅम्प' च्या मंचावरील इतिहासात सर्वात कमी वयाची स्पर्धक ठरली. या कार्यक्रमाचे प्रसारण दर गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता 'झी मराठी' वाहिनीवर होत आहे. 

गायिका म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी, संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या गायनाने मंत्रमुग्ध करणारी कु. श्रुती मेहनतीची पराकाष्ठा करत आहे. ती स्वतः सुद्धा हार्मोनियम छान वाजवते. तिला संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून आशीर्वाद व प्रतिसाद द्यावा, असे भावनिक आवाहन भांडे कुटुंबीय करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने