धुळे दि. 29 (शहर प्रतिनिधी) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुकीकरिता शिंदखेडा तालुका काँग्रेसच्या बैठकीत इच्छुक उमेदवारांची आज नरडाणा येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शामकांत सनेर साहेब..यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न .
शिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटी आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक निवडणुकीकरिता इच्छुक उमेदवारांच्या चाचपणी करिता आज नरडाणा येथे जैन मंगल कार्यालय येथे काँग्रेस पक्षाची पक्षाची बैठक संपन्न झाली बैठकीस सुमारे 200 च्या वर पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बेटावद खलाने नरडाणे मालपुर या जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी करण्यासंदर्भात विनंती केली तसेच खरदे मेथी दारूळ वर्षी व हातनुर या पंचायत समिती गणातील इच्छुकांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आपली उमेदवारी मागणी केलेली आहे.
भारतीय जनता पार्टी व केंद्र सरकारच्या चुकीमुळे आज ालुक्यातील या निवडणुका पुन्हा लादल्या जात आहे जनतेत जाताना पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या ओबीसी राजकीय आरक्षण विरोधाची भूमिका प्रत्येक कार्यकर्त्यांनी समाजापुढे मांडावे असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर यांनी केले आहे, राज्य शासन या निवडणुका होऊ नये म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करत आहे शासनाचा अथवा न्यायालयाचा निर्णय आपणास अंतिम असून जो निर्णय घेईल त्या निर्णया प्रमाणे आपण सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नानासाहेब पटोले व कार्याध्यक्ष आमदार कुणाल बाबा पाटील यांचा पक्ष पातळीवर निर्णय आपणा सर्वांना अंतिम राहील.
यावेळी कोरूना काळातील आपले जवळचे मित्र कार्यकर्ते नातेवाईक मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडले सभेच्या सुरुवातीस त्यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली, यावेळी शिंदखेडा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब पवार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रकाश पाटील सेवादलाचे अध्यक्ष विशाल पाटील खलाणे चे सरपंच शाम भिल बाबल्या चे सरपंच ज्ञानेश्वर पाटील मालपुर चे हेमराज नाना पाटील वीरेंद्र झालसे रतिलाल पाटील, मेथीचे भैय्या चौधरी आधी पदाधिकाऱ्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे शामकांत पाटील माधव शेठ बडगुजर भाईदास निळे जितेंद्र सिसोदे पंढरीनाथ सिसोदे प्रमोद सिसोदे डॉक्टर जयवंतराव बोरसे लोटन माडी शिंदखेडा नगरीचे विरोधी पक्षनेते सुनील चौधरी नगरसेवक दीपक अहिरे डॉक्टर प्रशांत बागुल उमेश पवार लोटन माळी मनोज मोरे नितीन मोरे संजय माळी सावखेड याची भगत दादा नंदू भाऊ साहेब, नितीन देसले महेंद्र देसले दयाराम वाळले, युवराज कडमल पावभा कोळी नाना भाऊ माळी पंडित विजय पाटील शहाणा भाऊ भदाणे किशोर ठाकरे भारत कोळी दत्तात्रय देसले रवींद्र पाटील बाया पाटील मकसूद शेख, प्रसन्न पाटील रावसाहेब कोळी शरद वानखेडे शरद पवार वसंत माळी किशोर बागल किशोर बंडु पाटील पंजाबराव पवार धनराज पाटील नाना मोरे संजय पाटील ईश्वर माळी ईश्वर वाघ पिंटू झाल असे पिंटू गिरासे रविंद्र सोनवणे रामकृष्ण धनगर हरी कुवर गजानंद सालसे मिलिंद भावसार पंकज सोनवणे रोहित पाटील राहुल पाटील कपिल पाटील मनोज वारुळे सुनील लांडगे सुनील वारुळे बटू माडी सुनिल पवार रशिद कुरेशी किशोर पवार विनायक पाटील बाबुराव पाटील बापू पाटील महेंद्र देवरे माधव देवरे कैलास आखाडे विलास गोसावी आधी प्रमुख पदाधिकार्यांची उपस्थिती होती.