शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या गुरूजींचे मेहनती सुपुत्र..* *शेखर पाटील यांची क्रीडा व युवक सेवेच्या उपसंचालक पदी नियुक्ती..* " *गणपुर" चे नाव राज्याच्या उपराजधानीत..* *चोपडयातून अभिनंदनाचा वर्षाव..* *गणपूर, ता. चोपडा दि. 28 (ॲड. बाळकृष्ण पाटील )

 *



गणपूर, ता. चोपडा  दि. 28 (ॲड. बाळकृष्ण पाटील )  :* चोपडा तालुक्यातील गणपूर निवासी शेखर भिमराव पाटील यांची पदोन्नतीवर नागपूर विभागाच्या क्रीडा व संचालनालय विभागात उप संचालक पदी नियुक्ती झाली आहे. हरहुन्नरी अधिकाऱ्यांनी आपली शैक्षणिक प्रगती साधत अत्यंत जिकरीच्या व मेहनतीच्या बळावर राज्याच्या उच्च पदस्य अधिकारांच्या बहुमानिक खुर्ची पटकावत गणपुर गावाचा नावलौकिक केला आहे. त्याबद्दल त्यांचे आख्ख्या तालुक्यात वाह.. वा..!होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिक्षणाच्या गुरूकिल्लीचे धडे गिरवत.. काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूने देश सेवेचे त्यागमय  जीवनाचा पाया रचण्याची कला रुजवणाऱ्या  गुरुजींच्या पाल्याने उच्च पदस्याची खुर्ची पटकविल्याने गुरुजन वर्गातही कमालीचे आत्मिक समाधानाची लहर पसरली आहे. 


याबाबत प्राप्त माहिती अशी, गणपूर 

येथील रहिवासी शेखर भिमराव पाटील यांची नागपूर विभागाच्या क्रीडा व युवक संचालनालय विभागात उप संचालक पदी नियुक्ती झाली आहे.                          पाटील यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून धुळे, बुलढाणा व अहमदनगर या ठिकाणी जबाबदारी सांभाळली असून मोलाची कामगिरी बजावली आहे. ते  सर्वप्रथम नांदगाव येथे येथे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून काम पाहत होते त्यानंतर त्यांनी अभ्यासाचा सराव करत एम. पी. एस. एस. ची परीक्षा उत्तीर्ण होऊन जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून काम उत्कृष्ट कामगिरी केली. आता त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांची उप संचालक पदी वर्णी लागली आहे. ते

प्राथमिक शिक्षक (कै)भिमराव लहू पाटील यांचे चिरंजीव व राहुल पाटील यांचे जेष्ठ बंधू आहेत.शेखर पाटील यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचे विविध स्थरातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने