🎯 *✍️✍️✍️✍️आज दिवसभरातील ठळक घडामोडी*
🗞️ *Lets Talk | News Bulletin*
✍️▪️10वीची बोर्डाची परीक्षा कोरोनामुळे रद्द झाली तरी प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रत्येक विषयाचं 100 गुणांचं मूल्यमापन होणार; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून निकष जाहीर.
✍️▪️मान्सून 31 मेनंतर केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता; देशात अनुकूल परिस्थिती; हवामान खात्याचा अंदाज.
✍️▪️सीबीएसई, आयसीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याची याचिकेवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाकडून 31 मेपर्यंत तहकूब.
✍️▪️कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांना महिन्याला पाच हजार रुपये भेटण्याची शक्यता; राज्य सरकारचा विचार.
✍️▪️देशात तब्बल 44 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद; गेल्या 24 तासांत 1.86 लाख नवे कोरोनाबाधित तर 2,59,459 रुग्ण कोरोनामुक्त.
✍️▪️कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना देवेंद्र फडणवीस यांचा आधार; 100 मुलांचं पालकत्व स्वीकारलं.
✍️▪️पुणे जिल्ह्यात शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा सुविधांवर असलेली बंधनं काढून टाकली जाणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा.
✍️▪️लसीकरणाचा वेग वाढवला नाही तर तिसरी, चौथीच नाही तर अनेक लाटा येतील; काँग्रेस नेते राहुल गांधींचा केंद्र सरकारला इशारा.
✍️▪️जागतिक कसोटी विजेतेपदाच्या अंतिम सामन्यासाठी ICC कडून खेळातील नियमांची घोषणा; कसोटी अनिर्णीत किंवा 'टाय' झाली तर दोन्ही संघ असतील संयुक्त विजेते.