जळगाव शहरातील दिव्यांग बांधवांसाठी उद्या कोविशील्ड लसीकरण

*जळगाव शहरातील दिव्यांग बांधवांसाठी उद्या कोविशील्ड लसीकरण* 
जळगाव दि. 26 ( प्रतिनिधी) 
शहरातील 45 वर्ष व त्यावरील दिव्यांग बांधवांसाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगाव वतीने दि. 27 मे रोजी दिव्यांग व्यक्तीस विना प्रतिक्षा लसीकरण करण्यात येत आहे.

 उद्या दि. 27 मे 2021 रोजी 45 वयोगटातील व त्या पुढील दिव्यांग बांधवांनी कोविशील्ड लसीकरणाचे कुपन घेण्यासाठी सकाळी 8 वाजता इंडियन रेडक्रॉस सोसायटी, सिव्हील हॉस्पीटलच्या बाजुला, जळगाव येथे उपस्थित रहावे.असे आवाहन इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी सोबत दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्राची प्रत व आधारकार्ड ची प्रत आणणे आवश्यक आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने