पंजाब नॅशनल बँकेला करोडोंचा गंडा घालून लूटणाऱ्या लूटारू मेहु


पंजाब नॅशनल बँकेला करोडोंचा गंडा घालून लूटणाऱ्या लूटारू मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक* दिल्ली दि. 27 - पंजाब नॅशनल बँकेला १३५०० कोटी रुपये कर्जाचा गंडा घालून बार्बुडातून अँटिग्वा फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला जेरबंद करण्यात यश मिळालं आहे. मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक त्याचा ठाव ठिकाणा सापडल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करत बेड्या ठोकून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
केंद्रीय अन्वेषण शाखेने चोक्सी याच्याविरोधातील आरोपांचा तपास सुरू केलेला असून, औपचारिक व अनौपरचारिक मार्गाने तो बेपत्ता झाल्यानंतर इंटरपोलनेही त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. तो रविवारी एका मोटारीत दिसला होता, ती मोटार पोलिसांनी तपासात ताब्यात घेऊन तपास सुरू केला असता चोक्सी याने अँटिग्वा व बार्बुडाचे नागरिकत्व घेतले असल्याची माहिती हाती आली. तो दक्षिण भागात गाडी चालवताना दिसला होता. जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळाला तेव्हा पासून केंद्रीय गुप्तचर यंत्रणा त्याच्या मागावर होती. चोक्सी यास डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे त्यामुळे त्याला भारतात आणणे सोपे झाल्याचे गुप्तचर यंत्रणणे म्हटले आहे,

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने