चोपडा शहर ठाण्याचे धडाकेबाज पोलीस अधिकारी अवतारसिंग चव्हाण यांचा मदुरा मायक्रोफानान्सतर्फे जोरदार सत्कार

चोपडा शहर ठाण्याचे धडाकेबाज पोलीस अधिकारी* *अवतारसिंग चव्हाण यांचा मदुरा मायक्रोफानान्सतर्फे जोरदार सत्कार* 

चोपडा दि. 27 (प्रतिनिधी) येथील मदुरा मायक्रोफानान्स लि. तर्फे सामाजिक बांधिलकी जपत कोरोना संकटाकाळात जोखीम घेऊन लढणाऱ्या पोलीस प्रशासनाचा सन्मान करण्यात आला. चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, महिला हेड कॉन्स्टेबल विद्या पांडुरंग इगळे , पोलीस शिपाई गजानन पाटील, मनोज पारधी, रविंद्र पाटील, होमगार्ड दिपक बोरसे, मिरा पाटील, यांचा सत्कार शाखा अधिकारी कृष्णा पाने व त्याचे सहकारी कर्मचारी सचिन जनजाळकर,हेमकांत गायकवाड, तनवीर पिजारी ,यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मदुराने विविध सुरक्षा निर्माण करणाऱ्या मास्क, सँनेटायझर, व्हँण्डग्लोव्हचे वाटप करण्यात आले. या कंपनीने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात पोलीस प्रशासनाला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबविला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने