चारचाकी वाहनधारकांनो प्रवासात झाडाच्या बिया टोचा... पाऊस जगवेल..जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंदूदादा नेवे याची भन्नाट कल्पना

*चारचाकी वाहनधारकांनो प्रवासात झाडाच्या बिया टोचा... पाऊस जगवेल..* *जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंदूदादा नेवे याची भन्नाट कल्पना* चोपडा दि. 27 (प्रतिनिधी) *निसर्गाने आपणास खुप काही दिले असून आपण परतफेड करण्याचा प्रयत्न केल्यास ते आपल्या आवाक्यात नाही. मात्र आपण निसर्गाच्या सान्निध्यात सुंदरतेची भर, समतोला असं खूप काही करू शकतो.. त्यासाठी आपल्या मनाची तयारी ठेवा तेव्हढे काफी आहे.मग विचार करू नका सर्व चार चाकी वाहनांच्या मालकांनी अथवा चालकांनी आता पाऊसाळ्याची चाहूल सुरू झाली असल्याने रस्त्याच्या कडेला वेळ काढून झाडे लावण्याचा प्रयोग सुरू केल्यास असंख्य टुमदार झाडे बहरू लागतील व मानवासह सजीवसृष्टीला नवसंजीवनी प्राप्त होईल अशी महान कल्पना जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंदूदादा नेवे यांनी मांडली आहे.* 
 त्यांच्या सुचक दृष्टीतून त्यांनी स्पष्ट केले आहे की, जून महिन्यात चारचाकी वाहनांतून परगावी जाताना आपल्या गाडीत छोटा खड्डा घेण्यासाठी खुरपे, टिकाव किंवा जाड लोखंडी सळई सोबत घ्यावी शिवाय 
गावराण आंब्याच्या कोयी, चिचोके, लिंबोळ्या, बदाम, सीताफळ, किंवा कोठल्याही बहुवर्षिय झाडांच्या बिया घ्याव्यात आणि प्रवासात टप्याटप्यावर गाडी थांबवून 
 रस्त्याच्या कडेपासून सुमारे ५-६ फूट दूर सोबत घेतलेल्या लोखंडी हत्याराने फक्त ४-५ इंच खोल खड्डे घ्यावेत व त्या खड्यात २ बिया टोचून खड्डा मातीने झाकून थोडी दाबा. सुमारे २५-३० फूट अंतरावर बिया टोचण्याचे कार्य रीपीट करत पुढे जात रहावे वेळ जसा आपल्याला जवळ आहे तसा सदुपयोग करत चला. ते झाडे पाऊसाच्या पाण्यावर नक्की जगतीलव परिसर सुजलाम सुफल झाल्याशिवाय राहणार नाही. अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे. 
आपण बिया सोबत न्यायला विसरलो तर या पिरीयेड मध्ये गुलमोहोर, रेनट्री, अकेशिया व तत्सम झाडांच्या बिया खाली पडलेल्या मिळतात, ती गोळा करून वापरू शकतो किंवा स्वानुभवानुसार सर्वात जास्त 'चिचोके' सोयीचे होऊ शकते पाऊस पडले की बिया रूजविण्याचे कार्य निसर्ग करेल. रस्ते ४-६ पदरी करताना काढावे लागलेले वृक्ष पुन्हा उगवतील. जास्तीत जास्त लोकांनी मनावर घेतल्यास वसुधा पुनश्च सुजलाम सुफलाम होईल. आपल्या मेहनतीने कार्बन कमी होवून उष्णता कमी होईल. सावली क्षेत्र व पर्जन्यमान वाढेल. पर्यावरणाचा, सृष्टीचा अशाप्रकारे आपण विमा उतरवू शकतो.असेही
 अशा त्यांच्या भन्नाट कल्पनेने जन हिताचा संदेश दिला आहे. तरी जनतेने गांभीर्याने घेऊन मोलाचे आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रत्यक्षात कृती उतरविण्याचा प्रयत्न करावा असेही त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने